आपल्या शरीराचं आरोग्य उत्तम राहण्यासाठी प्रत्येक अवयवाचं काम योग्यरित्या होणं गरजेचं असतं. यामधील महत्त्वाचा अवयव म्हणजे हृदय. हृदय योग्यरित्या कार्य करण्यासाठी त्याला सतत रक्तपुरवठा आवश्यक असतो. हा रक्तपुरवठा कोरोनरी धमन्यांच्या मार्फत होतो. मात्र ज्यावेळी या कोरोनरी धमन्या ब्लॉक होतात तेव्हा ऑक्सिजन तुमच्या हृदयापर्यंत पोहोचू शकत नाही, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो.
हृदयविकाराचा झटका अनेकदा जीवघेणारही ठरू शकतो. एका अहवालात असं नमूद करण्यात आलंय की, हृदयविकाराच्या झटक्याने ऑस्ट्रेलियात दररोज सुमारे 18-20 लोकांचा मृत्यू होतो. मात्र तुम्हाला माहितीये का कॉन्स्टीपेशन म्हणजेच बद्धकोष्ठतेचा त्रास देखील हॉर्ट अटॅक येण्याचे संकेत असू शकतात.
मेलबर्न मोनाश युनिव्हर्सिटीने केलेल्या ताज्या संशोधनात असं दिसून आलंय की, बद्धकोष्ठतेच्या समस्येमुळे हृदयविकाराच्या समस्या उद्भवू शकतात. प्रोफेसर फ्रान्सिस मार्क्स म्हणाले की, बद्धकोष्ठता ही एक सामान्य समस्या असून जर ही समस्या वारंवार तुम्हाला त्रास देत असेल तर होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. कारण ही समस्या हृदयाच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. दीर्घकाळ कॉन्स्टीपेशनच्या समस्येने हॉर्ट अटॅकचा धोका असतो.
अमेरिकन जर्नल ऑफ सायकॉलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासात असं नमूद करण्यात आलं आहे की, बद्धकोष्ठतेची तक्रार करणाऱ्या लोकांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याचा धोका हा इतर लोकांच्या तुलनेत दुप्पट असल्याचं पाहायला मिळालं.
आपलं आरोग्य आणि आतड्याची क्षमता यांचाही हृदयाच्या आरोग्यावर परिणाम होत असतो. जर आतड्यांचं आरोग्य चांगलं नसेल आणि तुम्ही व्यायाम करत नसाल तर बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवू शकते.
छातीत वेदना होणं हे हार्ट अटॅकचं सामान्य लक्षण मानलं जातं.
डाव्या हातात वेदना होत असतील किंवा हात सुन्न होत असेल तर हे देखील हार्ट अटॅकचं लक्षण असू शकतं.
श्वास घेण्यास त्रास होत असेल तर हा देखील एक संकेत असू शकतो.
पाठीत दुखणं किंवा सतत अस्वस्थ वाटत असेल तर वेळीच डॉक्टरांची मदत घ्या.
चक्कर येणं हे देखील हार्ट अटॅकचं एक गंभीर लक्षण मानलं जातं.
डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.