बाबो! इथं सरकारच तरुणांना वाटतंय मोफत कंडोम; कारण ऐकून चक्रावून जाल!

आता सरकारने तरुणांना मोफत कंडोम वाटण्याचा निर्णय घेतला आहे.
Free Condoms Distribute
Free Condoms Distribute Saam TV
Published On

Free Condoms Distribute : प्रेमाचा पुढचा टप्पा म्हणजे प्रणय, सोप्या भाषेत सांगायचं झालं तर शारीरिक संबंध ठेवणं. शारीरिक संबंध ठेवताना कंडोमचा वापर करा. त्यामुळे नको असलेली गर्भधारणा टाळण्यास मदत तर होतेच, शिवाय तुम्ही स्वत:ला लैंगिक आजारांपासून देखील सुरक्षित ठेवू शकता, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिला जातो. पण कंडोम खरेदी करताना अनेकांना लाज वाटते. त्यामुळे आता सरकारने तरुणांना मोफत कंडोम वाटण्याचा निर्णय घेतला आहे. (Latest Marathi News)

Free Condoms Distribute
Beed Crime : बाप नव्हे हा तर हैवान! पोटच्या मुलीसोबत केलं धक्कादायक कृत्य; बीडमधील संतापजनक घटना

यापुढे १८ ते २५ वर्ष वयोगटातील तरुणांना (Relation) सरकारकडून मोफत कंडोम वाटप होणार आहे. पण हे भातात नव्हे तर फ्रान्समध्ये घडतं आहे. शुक्रवारी फ्रान्सचे राष्ट्रपती एमॅनुअल मॅक्रो यांनी पुढील २५ वर्ष तरुणांना मोफत कंडोम वाटले जाईल, अशी घोषणा केली आहे.

नको असलेली गर्भधारणा रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं आहे. गर्भनिरोधनासाठी ही छोटीशी क्रांती असल्याचंही मॅको यांनी म्हटलं आहे. देशातील तरुणांना फार्मान्सीमध्ये मोफत कंडोम उपलब्ध करून दिलं जाईल असं ते म्हणाले.

Free Condoms Distribute
Mumbai Crime : मुलानेच केली आईची हत्या; मृतदेह पेटीत भरून नदीत फेकला, नात्याला काळीमा फासणारी घटना

असुरक्षित लैंगिक संबंध हे एचआयव्ही एड्स पसरण्याचे प्रमुख कारण मानले जाते. फ्रेंच आरोग्य अधिकार्‍यांच्या मते, २०२० आणि २०२१ मध्ये देशातील लैंगिक आजारांचे प्रमाण ३० टक्क्यांनी वाढले आहे. यामध्ये प्रामुख्याने तरुण तसेच तरुणांचं प्रमाण सर्वाधिक आहे.

हीच बाब लक्षात घेता फ्रान्स सरकारने १ डिसेंबर रोजी एड्स जनजागृतीची मोहिम सुरू केली. या मोहिमेचा उद्देश लोकांना लक्षात आणून देणे की योग्य उपचाराने एड्सचे रुग्ण विषाणूचा प्रसार रोखू शकतात. या वर्षाच्या सुरुवातीला, फ्रेंच सरकारने २५ वर्षांखालील सर्व महिलांना मोफत गर्भनिरोधक गोळ्या देण्याची घोषणा केली होती. मात्र, आर्थिक अडचणींमुळे आता तरुणांना कंडोम वाटपाचा निर्णय सकारने घेतला आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com