Ashadhi Ekadashi 2022 : एकादशीच्या दिवशी साबुदाणा वडा फुटू नये यासाठी ही ट्रिक फॉलो करा

असा बनवा साबुदाणा वडा.
how to make sabudana vada, Recipe, Food tips
how to make sabudana vada, Recipe, Food tips ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
Published On

मुंबई : उपवास म्हटलं की, आपल्या सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते. उपवासाच्या दिवशी आपल्या रोजच्या आहारापेक्षा काही वेगळे पदार्थ खायला मिळतात.

हे देखील पहा -

बऱ्याचदा आपण उपवासाच्या दिवशी साबुदाणा वडा बनवण्याचा प्रयत्न करतो परंतु, तो बरोबर बनत नसल्यामुळे किंवा त्याचे योग्य प्रमाण न घेतल्यामुळे तो फुटतो यासाठी आपण वडा बनवण्याचे टाळतो. वडा बनवण्याऐवजी आपण साबुदाण्याची खिचडी किंवा तिची खिर बनवतो. पण ही ट्रिक वापरल्यास साबुदाणा वडा कधीच फुटणार नाही. जाणून घ्या ही सोपी ट्रिक

साहित्य -

भिजवलेला साबुदाणा - २ वाटी

उकडलेला बटाटा - १ १/२ वाटी

भाजलेल्या दाण्याचा जाडसर कूट- १/४ वाटी

मीठ - चवीनुसार

जीर - आवश्यकतेनुसार

बारीक चिरलेली हिरवी मिरची - २ ते ३

बारीक चिरलेली कोथिंबीर - १ ते २ छोटे चमचे

पीठीसाखर (Sugar) - १ ते १ १/२ चमचा

तळण्यासाठी तेल - आवश्यकतेनुसार

how to make sabudana vada, Recipe, Food tips
Ashadhi Ekadashi 2022: आषाढी एकादशीनिमित्त उपवासाची थाळी कशी असायला हवी ?

कृती -

साबुदाणा भिजवताना हा साधारण ७ ते ८ तास भिजवून घ्यावा. तो भिजल्यानंतर बोटाने स्मॅश करुन पहा. तो स्मॅश योग्य प्रकारे झाला असल्यास त्यात उकडून स्मॅश केलेले बटाटे घाला. मोठ्या पसरट ताटात किंवा परातीत भिजवलेला साबुदाणा व उकडलेले बटाटे घालून चांगले मळून घ्या. मळताना साबुदाणा चांगला स्मॅश झाल्यास वडा फुटणार नाही. नंतर यामध्ये भाजलेल्या दाण्याचा जाडसर कूट, मीठ, जीर, बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेली कोथिंबीर व पीठीसाखर घालून मिश्रण चांगले एकजीव करा. वडे तयार करताना हाताला तेल लावून घ्या. त्याचे गोळी बनवून हातावर थापून घ्या. ज्यामुळे वडा फुटण्याची शक्यता कमी होईल. वडे तळताना तेल (Oil) मध्यम गरम असायला हवे. मंद आचेवर वडे तळून घ्या. वडे तळाताना वरुन त्यांचा रंग बदलू लागला की, त्यांना उलटून घ्या. सोनेरी रंग येईस्तोवर हे तळून घ्या व गोड दह्यासोबत सर्व्ह करा.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com