Relationship Tips : पार्टनरसमोर या गोष्टी बोलताना अजिबात लाजू नका; नंतर होईल पश्चाताप

Relationship Tips : पार्टनरबरोबर काही ठरावीक गोष्टी शेअर करणे महत्वाचं असतं. तसे न केल्यास तुमच्या नात्यात अडचणी आणि संकटं येऊ शकतात.
Relationship Tips On Divorce
Relationship TipsSaam TV
Published On

प्रत्येकासाठी त्याच्या आयुष्यातील जोडीदार फार खास असतो. प्रियकर, प्रेयसी, पती-पत्नी ही नाती अगदी जगावेगळी असतात. ही अशी नाती आहेत ज्यात प्रत्येक व्यक्ती या नात्यातील पार्टनरसोबत आपलं आयुष्य जगतो. पार्टनरबरोबर आयुष्य जगताना आपल्याला अनेक अडचणी येतात वाद होतात. मात्र तरीही जी व्यक्ती खरं प्रेम करते ती आपल्या जोडीदाराला कधीच सोडून जात नाही.

Relationship Tips On Divorce
Relationship With In Laws: लग्नानंतर मुली सासरचं घर आपलं मानतात, पण मुलं असं का करू शकत नाही?

नात्यात दोघांचाही एकमेकांवर विश्वास असणे महत्वाचं आहे. त्यासाठी दोघांनी एकमेकांशी मोकळेपणाने संवाद साधला पाहिजे. संवाद साधताना दोघांमध्ये कोणतीही अडचण येणार नाही याचीही काळजी घेतली पाहिजे. आपल्या आयुष्यात अशा अनेक गोष्टी असतात ज्या आपण सर्वांना शेअर करू शकत नाही. मात्र पार्टनरबरोबर काही ठरावीक गोष्टी शेअर करणे महत्वाचं असतं. तसे न केल्यास तुमच्या नात्यात अडचणी आणि संकटं येऊ शकतात.

या गोष्टी न लाजता पार्टनरशी शेअर करा

तुमचे विक पॉइंट्स

प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात विविध समस्या असतात. यातील काही वीत पॉइंट्स सुद्धा असतात. त्यामुळे पार्टनरला आपले वीक पॉइंट नेहमी सांगा. वीक पॉइंट सांगितल्याने पार्टनर त्या गोष्टी लक्षात ठेवेल. तसेच कोणत्याही प्रसंगी वीक पॉइंट वरून तुम्हाला त्रास देणार नाही आणि तुमच्याशी बोलताना १० वेळा विचार करेन.

तुमच्या भावना

आपल्याला काय वाटतं आणि काय फिल होतं हे प्रत्येक व्यक्तीला नाही तर आपल्या पार्टनरला माहिती पाहिजे. त्यासाठी पार्टनरला नेहमी तुमच्या मनातील आनंद, दु:ख आणि सर्वच भावना शेअर करा. भावना शेअर केल्याने पार्टनरला तुमच्याशी कसे वागावे. कोणत्या गोष्टींवरून चुका करू नये हे मसजण्यास मदत होईल.

स्वत:च्या गरजा

प्रत्येक व्यक्तीच्या काही ठरावीक गरजा असतात. यामध्ये शारीरिक, भावनिक आणि काही गरजा मानसिक सुद्धा असतात. त्यामुळे तुमच्या ज्या काही गरजा आहेत त्या तुम्ही पार्टनरला खुलून सांगितल्या पाहिजेत. पार्टनरला आपल्या गरजा सांगताना अजिबात लाजू नका किंवा कोणताही संकोज बाळगू नका. याने तुमचं नातं आणखी जास्त घट्ट होईल.

Relationship Tips On Divorce
Relationship Tips: तुमच्या पार्टनरला कसं खूश ठेवाल? सोनाक्षी सिन्हाच्या या भन्नाट ट्रिक्स करा फॉलो

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com