लिव्हर आपल्या प्रत्येकाच्या शरीरातील एक महत्वाचा अवयव आहे. लिव्हर म्हणजेच यकृतामध्येच आपल्या शरीरातील पचनसंस्थेशी संबंधित अनेक कामे होत असतात. लिव्हरमध्येच पित्त तयार होते. त्याने अन्न पचण्यास मदत होते. लिव्हर आपल्या शरीरातील अतिरिक्त ग्लुकोज सेव्ह करून ठेवतात.
लिव्हर शरीरातील एक अतिशय महत्वाचा अवयव आहे. आपण आरोग्याची काळजी घेताना लिव्हरची सुद्धा काळजी घेतली पाहिजे. मात्र अनेक व्यक्ती मद्यपान करतात. मद्यपान केल्याने आपला लिव्हर खराब होतो. मात्र काही व्यक्ती दारूचे सेवन करत नाहीत. तरीही त्यांचे लिव्हर खराब होते. याचं कारण म्हणजे ते खात असलेले बाहेरील काही ठरावीक पदार्थ.
बाजारात मिळणारे काही पदार्थ अगदी दारू पेक्षा सुद्धा घातक असतात. त्यामुळे आपल्या लिव्हरवर गंभीर परिणाम होतो. लिव्हर पूर्णता खराब होतं. तुम्ही देखील आहारात या पदार्थांचा समावेश करत असाल तर आजपासूनच थांबवा. कारण या पदार्थांमुळे तुम्हाला लिव्हरचा कॅन्सर होण्याचीही शक्यता असते.
जास्त फॅट्स असलेले पदार्थ
हार्वर्ड हेल्थच्या अहवालानुसार, तळलेले पदार्थ, जंक फूड आणि गोड पदार्थ आपल्या लिव्हरसाठी फार घातक आहेत. हे पदार्थ खाल्ल्याने आपल्या शरीरात जास्त चर्बी जमा होते. याचा पूर्ण परिणाम थेट आपल्या लिव्हरवर होत असतो. त्यामुळे लिव्हर वाचवण्यासाठी फॅट्स फ्री आहार करावा.
साखरेचं सेवन
काही व्यक्तींना अती प्रमाणात गोड खाण्याची सवय असते. जेवणात प्रत्येकवेळी त्यांना गोड पदार्थ खायचे असतात. जास्त गोड खाल्ल्याने आपल्या शरीरातील साखरेचं परिणाम वाढतं. डायबिटीज वाढल्याने लिव्हरवर थेट परिणाम होतो.
प्रोसेस्ड फूड
सध्याच्या धावपळीच्या जीवनात व्यक्ती बऱ्याचदा प्रोसेस्ड फूड खाणे पसंत करतात. झटपट जेवण बनवून पोट भरतं. त्यामुळे जास्त काही बनवण्यापेक्षा व्यक्ती असे काही प्रोसेस्ड फूड बनवणे पसंत करतात. मात्र जेवण बनवण्याचा शॉर्टकट आपली लाँग लाइफ कमी करत असते.
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.