
हिवाळ्यात वेगवेगळ्या पदार्थांचा आनंद घ्यायला प्रत्येकालाच आवडतं. थंडीच्या वातावरणात मटारपासून बनवलेल्या रेसिपीचा आस्वाद घ्यायला जवळपास सगळ्यांनाच आवडतो. त्यामुळे प्रत्येक घरात मटारचे काही न काही पदार्थ बनत असतात. हिवाळ्यात मटारपासून पुलाव आणि पराठ्यांपर्यंतच्या आणि भाज्या बनवल्या जातात. पण मटारची कोणतीही रेसिपी बनवण्याआधी ती मटार सोलावी लागते ज्याचा अनेकांना त्रास होतो. ते सोलायला इतका वेळ लागतो की अनेक वेळा लोक चिडतात . त्यामुळे जर तुम्हालाही वाटाणे सोलण्याचा त्रास होत असेल तर या सोप्या टिप्स नक्की फॅालो करा.
मटार पाण्यात उकळवा
अनेकांना मटार सोलायला आवडत नाही. याचा फार कंटाळा येतो. पण तुम्हाला मटारसोलण्यात जास्त वेळ घालवायचा नसेल तर तुम्ही ही सोपी पद्धत ट्राय करा. मटार लवकर पिघळवण्यासाठी गरम पाण्यात २-३ मिनिटे उकळा. यानंतर मटार बर्फाच्या थंड पाण्यात टाका. गरम पाणीमुळे साल मऊ होईल. आणि दाणे सहजपणे निघतील. आणि तुम्ही कोणतेही पदार्थ झटपट बनवू शकता. आणि त्यांचा आनंद घेऊ शकता.
पिशवी शेक पद्धत
जर तुमच्याकडे मटार उकळण्यासाठी वेळ नसेल , तर साल काढण्यासाठी प्लास्टिकची पिशवी वापरा. मटार एका पिशवीत ठेवा आणि हलके घासा. घर्षणामुळे साले फुटतील आणि दाणे सहज वेगळे होतील. यामुळे तुमच्या वेळेची बचत होईल. आणि जेवण लवकर बनवण्यात मदत होईल. त्यामुळे या टिप्स नक्की फॅालो करुन बघा.
मटार फ्रीजरमध्ये ठेवा
अगदी सोप्या पद्धतीने मटार सोलण्यासाठी तुम्ही फ्रीजरचीही मदत घेऊ शकता. मटार एक तास फ्रीजरमध्ये ठेवा. त्यानंतर जेव्हा तुम्ही वाटाण्याच्या साली दाबाल तेव्हा त्यातील दाणे सहज बाहेर येतील. आणि तुम्हाला जेवण बनवायला उशीर होणार नाही. आणि तुमचे काम लवकर होईल.