Valentine's Day 2023 : यंदाच्या व्हॅलेंटाईन डेला इमोशनल इंटिमेसीमुळे दूर होईल नात्यातील कटूता, या 3 टिप्स फॉलो करा

Relationship Special : नातेसंबंध यशस्वी होण्यासाठी भावनिक जवळीक असणे खूप गरजेचे असते.
Valentines Day 2023
Valentines Day 2023 Saam Tv
Published On

Valentine's Day Special : नातेसंबंध यशस्वी होण्यासाठी भावनिक जवळीक असणे खूप गरजेचे असते. जोडप्यांमध्ये अंतर कमी करण्यासाठी शारीरिक जवळच प्रमाणेच भावनिक जवळ देखील महत्त्वाची भूमिका बजावतात.

बरीच जोडपी अशी असतात जे काहीही न बोलता एकमेकांच्या हावभावावरून मन समजून घेतात. नाते टिकवण्यासाठी विश्वास खूप महत्त्वाची भूमिका बजावत असतो एकदा का विश्वास डळमळीत झाला की वैवाहिक (Married) जीवनात अनेक अडचणी येतात आणि कितीदा हे घटस्फोटाचे कारण देखील ठरू शकते.

त्यामुळे वैवाहिक जीवनात जवळीक अन्य खूप कठीण होऊन जाते. पण प्रयत्न केल्यास भावनिक जवळीक पुन्हा निर्माण करण्यासाठी खूप काही करता येते. पण आधी भावनिक (Emotional) जवळीक म्हणजे काय? ते जाणून घेऊया.

Valentines Day 2023
Valentines Day 2023 Gifts : 'व्हॅलेंटाईन डे'ला पार्टनरला देऊच नका 'या' भेटवस्तू, नात्यात येईल कटूता !

भावनिक जवळीक म्हणजे काय?

भावनिक जवळीक म्हणजे नात्यांमध्ये दोन्ही पार्टनर्सला एकमेकांबद्दल विश्वास, सुरक्षित आणि प्रेम वाटते. भावनिक जवळीक असण्यासाठी संवाद आणि विश्वास महत्वाचे असते.भावनिकदृष्ट्या जेव्हा जोडपे जवळ असतात तेव्हा ते एकमेकांना खूप चांगले ओळखून घेतात,काहीही न बोलता हावभाववरून ते समोरच्याच्या वेदना समजून घेतात.

भावनिक जवळीकसाठी महत्वाच्या टिप्स -

प्रामाणिकपणा -

भावनिक जवळीक वाढवण्यासाठी सर्वात महत्त्वाचे आणि एकमेव मार्ग म्हणजे एकमेकांशी प्रामाणिक असणे. त्यासाठी जोडप्यांमध्ये संवाद असणे खूप आवश्यक असते. जर नात्यात प्रामाणिकपणा असेल तर नाते आणखीन घट्ट होते आणि प्रेम वाढते. जोडीदारापासून कोणतीही गोष्ट न लपवता त्याच्याशी प्रामाणिकपणे संवाद साधला पाहिजे त्यामुळे मनातील गोष्टी बोलणे सोपे होईल.

Valentines Day 2023
Valentine Day Gifts: हृदयातील गोष्टी ओठांवर आण्यासाठी 'या' सुंदर गिफ्टसची मदत घ्या

क्षमाशीलता -

लग्न करणे ही आयुष्यभराची बांधिलकी असते त्यामुळे आपल्या जोडीदाराचे काही चुकले तर त्याला लगेच माफ केले पाहिजे. चुका ह्या माणसाकडून होतच असतात त्यामुळे जोडीदाराच्या चुका माफ करून नाती मजबूत करता येतात.

बऱ्याचदा जोडपे एकमेकांच्या चुका स्वीकारत नाहीत. त्यामुळे त्यांच्या नात्यात दुरावा आणि नाराजी निर्माण होते.म्हणून जर काही चुकले तर लगेच माफी मागितली पाहिजे.नाते घट्ट करण्यासाठी भावनिक जवळ असणे खूप गरजेचे असते. काही छोटया-छोटया गोष्टींची काळजी घेऊन आपण नाते आणखी घट्ट करू शकतो.

मोकळेपणा -

भावनिक जवळीक असण्यासाठी जोडप्यांनी एकमेकांसोबत मनमोकळे असणे गरजेचे असते. मनात कोणतेही संकोच न करता मोकळेपणाने एकमेकांशी संवाद साधला पाहिजे.दोघानाही आयुष्यात स्वतःचा निर्णय घेण्याचा अधिकार असला पाहिजे. कारण लागलेली नाती फार कमी काळ टिकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com