
स्त्रियांच्या सुंदरतेचे पहिले आकर्षण त्यांचे केस असतात. चमकदार आणि मऊ केस आत्मविश्वास वाढवतात. प्रत्येक स्त्रीला तिचे केस काळे, घनदाट, चमकदार आणि मऊ दिसावे असं वाटत असतं. यासाठी मोठ-मोठ्या पार्लर्स मध्ये पैसे खर्च करून केसांची स्मूथनिंग केली जाते. काही दिवसांसाठी केस हवेतसे सुंदर दिसतात. पण यानंतर योग्य काळजी न घेतल्यास याचा परिणाम दिर्घकाळ राहत नाही. यामुळे केसांना नुकसान पोहोचू शकते.
एक्सपर्टच्या मते, पार्लरमध्ये जाऊन केसांवर केमिकल ट्रिटमेंट करण्यापेक्षा, घरगुती उपाय करून नैसर्गिक पद्धतीने चमकदार आणि मऊ केस मिळवता येतात. यासाठी तुम्ही जवसाच्या बिया आणि तांदळाच्या मदतीने घरीच केसांसाठी जेल तयार करू शकता. जवसाच्या बियांमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड, व्हिटॅमिन ई आणि केसांना पोषण देणारे घटक असतात. तर, तांदूळ जीवनसत्त्वे आणि खनिजांनी परिपूर्ण असतात. जे केसांचा पोत सुधारतात व केसांना मजबूती देतात.
हेअर जेल कसे बनवायचे?
१. ४ कप पाणी घ्या
२. या पाण्यात जवसाच्या बिया आणि तांदूळ प्रत्येकी ४ चमचे घाला.
३. हे मिश्रण त्यातील पाणी ५०% कमी होईपर्यंत उकळवून घ्या.
४. तयार झालेले जेल एका बाटलीत गाळून घ्या.
हे जेल केसांवर कधी व कसे अप्लाय करायचे?
१. केस धुण्याच्या अर्धा तास आधी केसांच्या मुळांपासुन ते शेवटच्या टोकापर्यंत केसांवर लावून ठेवा.
२. नंतर माइल्ड शॅम्पूने केस धुवा.
३. हे जेल आठवड्यातून फक्त दोनदाच वापरा.
४. जेल बनवताना २ वेळेस पुरेल इतकेच बनवा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.