Ratha Saptami 2026: रथसप्तीच्या दिवशी बनतायत ५ शुभ संयोग; पाहा आज कधी आहेत शुभ मुहूर्त?

Ratha Saptami 2026 Date: हिंदू पंचांगानुसार आज रथसप्तमीचा दिवस असून या दिवशी पाच शुभ योग निर्माण झाले आहेत. सूर्यदेवाची पूजा करण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.
Ratha Saptami 2026 Date
Ratha Saptami 2026 Datesaam tv
Published On

रथ सप्तमीला भानु सप्तमी असंही म्हटलं जातं. रथ सप्तमी ही कृष्ण पक्षाच्या सातव्या दिवशी किंवा महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या रविवारी साजरी करण्यात येते. या वर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी रविवारी येतेय. या रथ सप्तमीला पाच शुभ संयोग घडत आहेत.

जर तुमच्या कुंडलीत सूर्य दोष असेल तर तो दूर करण्यासाठी हा खूप चांगला दिवस आहे. रथ सप्तमीला कोणते पाच शुभ संयोग घडत आहेत आणि सूर्य दोष दूर करण्यासाठी कोणते उपाय आहेत?

Ratha Saptami 2026 Date
Samsaptak Yog: 2 दिवसांनी शक्तीशाली गुरु बनवणार समसप्तक राजयोग; 'या' राशींना मिळणार अचानक धनलाभ

रथ सप्तमीची वेळ

वैदिक पंचागानुसार, माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी म्हणजेच आज रात्री १२:३९ वाजता सुरू होणार आणि त्याच दिवशी रात्री ११:१० वाजता संपणार आहे.

रथ सप्तमीचा मुहूर्त

रथ सप्तमीचा सूर्योदय सकाळी ७:१३ वाजता होणार आहे. या दिवशी ब्रह्म मुहूर्त पहाटे ५:२६ ते ६:१९ पर्यंत आहे. रथ सप्तमीचा अभिजित मुहूर्त दुपारी १२:१२ ते १२:५५ पर्यंत आहे. रथ सप्तमीचा शुभ मुहूर्त सकाळी ८:३३ ते दुपारी १२:३४ पर्यंत आहे. या काळात तुम्ही रथ सप्तमी पूजा, दान आणि इतर विधी करू शकता.

पाहूयात रथ सप्तमीचे शुभ संयोग

रवि योग

रथ सप्तमीला पहिला संयोग रवि योग आहे. या दिवशी रवि योग सकाळी ७:१३ ते दुपारी १:३५ पर्यंत असतो. रवि योगादरम्यान सूर्य देवाचा प्रभाव जास्त असतो. जो सर्व नकारात्मक प्रभावांना कमी करण्यास मदत करतो.

सर्वार्थ सिद्धि योग

या दिवशीचा दुसरा शुभ संयोग म्हणजे सर्वार्थ सिद्धि योग. सर्वार्थ सिद्धि योग दुसऱ्या दिवशी, २६ जानेवारी रोजी दुपारी १:३५ ते सकाळी ७:१२ पर्यंत असतो. सर्वार्थ सिद्धि योगात केलेली कामं यशस्वी मानली जातात. हा एक अतिशय शुभ योग आहे.

Ratha Saptami 2026 Date
RR vs GT : Thank You God ! गिलला जीवनदान मिळताच बहिणीनं देवाचे मानले आभार, रिअॅक्शनचा व्हिडिओ व्हायरल

सिद्ध योग

रथ सप्तमीला तिसरा शुभ संयोग म्हणजे सिद्ध योग. सिद्ध योग या दिवशी पहाटेपासून सकाळी ११:४६ पर्यंत असतो. ध्यान, जप, योग आणि आध्यात्मिक साधनांसाठी हा योग शुभ मानला जातो.

सधी योग

या दिवसाचा चौथा शुभ संयोग म्हणजे सधी योग. सधी योग सकाळी ११:४६ वाजता तयार होईल आणि २६ जानेवारी रोजी सकाळी ९:११ पर्यंत राहील. कामात यश मिळवण्यासाठी देखील ही संयोग शुभ आहे.

Ratha Saptami 2026 Date
Shadashtak Yog 2024: शुक्र-मंगळाच्या युतीने बनला षडाष्टक राजयोग; 'या' राशी होणार श्रीमंत, करियरमध्येही होणार प्रगती

पाचवा योग

रेवती नक्षत्र रथ सप्तमी नक्षत्राशी जुळतो. रेवती नक्षत्र पहाटेपासून दुपारी १:३५ वाजेपर्यंत चालतं. त्यानंतर अश्विनी नक्षत्र प्रभावी होतं. रेवती नक्षत्राचा अधिपती बुध ग्रह आहे. रेवती नक्षत्राच्या काळात शुभ कार्ये करणं शुभ मानण्यात येतं.

Ratha Saptami 2026 Date
Gajkesari Rajyog 2026: देवतांचा गुरु बृहस्पति बनवणार पॉवरफुल योग; बँक बॅलन्स वाढून करियरमध्येही होणार प्रगती

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com