Fitness Tips : विकेंडमध्ये करा याप्रकारे व्यायाम, आठवडाभर राहाल फिट अँड फाइन

व्यस्त जीवनशैलीमुळे, आपल्यापैकी बहुतेकांना स्वतःसाठी वेळ देणे थोडे कठीण होते.
Fitness Tips
Fitness TipsSaam Tv

Fitness Tips : ख्रिसमसच्या सुट्टीत आपण सगळेत जण कुठे ना कुठे तरी फिरायला जाणार. या काळात बाहेरचे खाद्यपदार्थ आपण खातो. अशावेळी आपल्याला आरोग्याची काळजी घेता येत नाही.

व्यस्त जीवनशैलीमुळे, आपल्यापैकी बहुतेकांना स्वतःसाठी वेळ देणे थोडे कठीण होते. यामुळे आपण रोज योगासने आणि व्यायामाला वेळ देऊ शकत नाही. पण वीकेंडला काही हलके व्यायाम करून तुम्ही स्वतःला फिट ठेवू शकता. अशाच काही व्यायामांबद्दल जाणून घ्या.

संपूर्ण आठवडा स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी तुम्ही फक्त दोन दिवस म्हणजे वीकेंडला योग किंवा व्यायाम करू शकता. यामुळे तुम्हाला संपूर्ण आठवडा उत्साही वाटेल.

Fitness Tips
Yoga Benefits : तरुणांमध्ये नैराश्याची समस्या वाढतेय ? 'या' योगासंनानी मात करा

1. पाठीसाठी प्लँक व्यायाम

plank exercise
plank exerciseCanva

प्लँक एक्सरसाइज करून तुम्ही तुमच्या शरीरातील चांगले फॅट जलद बर्न करू शकता. या व्यायामामुळे तुम्हाला अनेक फायदे मिळतात. यासोबतच काही प्रयोग करून पाठीच्या कण्यालाही व्यायाम करता येतो.

2. जंपिंग जॅक्स

jumping jacks
jumping jacksCanva

हाता-पायांचा व्यायाम करण्यासाठी आपण जंपिंग जॅक्स करुन शकतो ज्यामुळे रक्ताभिसरण पूर्वीपेक्षा चांगले होते.

3. स्किपिंग

skipping
skippingCanva

स्किपिंग हा सर्वात सोपा व्यायाम आहे. यामुळे आपले वजन कमी (Weight-loss) करता येईल तसेच शरीराची ताकद वाढवता येईल.

4. स्क्वॅट्स

squats
squatsCanva

स्क्वॅट्समुळे पाय आणि पाठीचा खालचा भाग मजबूत होतो आणि या भागांची चरबीही कमी होते.

5. क्रंचेस

crunches
crunchesCanva

पोट कमी करण्यासाठी क्रंच हा एक उत्तम व्यायाम आहे. अगदी वीकेंडमध्येही हा व्यायाम केला तर संपूर्ण आठवडाभर काम होते. पण असे करू नका की, तुम्ही वीकेंडला क्रंच करा आणि बाकीचे आठवडाभर भरपूर खा. अशा स्थितीत पोट काही कमी होत नाही.

6. योग

Yoga
YogaCanva

भुजंगासन, तितली आसन, अर्ध चंद्रासन, सूर्यनमस्कार यासारखी योगासनांची (Yoga) निवड करा, ज्यांना जास्त लवचिकतेची आवश्यकता नाही. नवशिक्याही हे आसन करू शकतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com