१२० वर्षे जुना जागतिक ब्रँड असलेल्या फायरस्टोनने रोडहॉक 2z हे नवीन टायर लाँच करण्यात आलं आहे. या टायरला ५ वर्षांची वॉरंटी उपलब्ध आहे. मार्केटमध्ये नवीन गुणवत्तापूर्णक टायर उपलब्ध करून देण्याचा मानस आहे. या टायरची ब्रेकिंग क्षमताही उत्तम आहे. (Latest Marathi News)
फायरस्टोन’च्या रोडहॉक 2z टायरमध्ये हॅचबॅक, सेदान आणि सीयूव्ही आहेत. तसेच रोडहॉक 2z टायर 12 ते 16 इंच रिम कव्हरेजकरिता सक्षम आहे.
चीफ कर्मशियल ऑफिसर राजश्री मोईत्रा म्हणाल्या, आमचं फायरस्टोनचं रोडहॉक 2z टायर मार्केटमध्ये आणताना अभिमान वाटत आहे. आमच्या फायरस्टोन कंपनीची स्थापना १९०० साली झाली. आमच्या टायरला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळेल असा आत्मविश्वास वाटतो'. (Latest News)
फायरस्टोन टायरमध्ये हाय कार्बन ब्लॅक रेशो आहे. तसेच टायरमध्ये अधिक चांगला रोलिंग रेझिस्टन् आहे. यामुळे टायरवरील घर्षण अधिक होत नाही. टायरची ब्रेकिंग चांगली आहे. त्यामुळे रस्त्यावर ब्रेक घेतल्यानंतर टायर लगेच थांबतात. तसेच या टायरची लवचिकता वाढविण्यासाठी शिअर स्ट्रेस आणि कमी घसरण हे दोन्ही एकत्रितपणे कार्य करते. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.