Hartalika Fast 2022 : हरतालिकेचे व्रत करताय? 'या' दिवशी कोणत्या पदार्थांचे सेवन टाळावे

हरतालिकेचे व्रत करताना कोणत्या पदार्थांचे सेवन करावे ?
Hartalika Fast 2022
Hartalika Fast 2022Saam Tv
Published On

Hartalika Fast 2022 : हरतालिकेचे व्रत करण्याची बरेच जणांना इच्छा असते. विवाहित महिला आपल्या पतीचे दिर्घायुष्यासाठी वाढावे व कुमारीका आपल्याला चांगला पती मिळावा यासाठी हा उपवास करतात.

यंदा हरतालिका ही मंगळवारी, ३० ऑगस्टला करण्यात येणार आहे. हिंदू संस्कृतीत याला विशेष महत्त्व आहे. असे सांगितले जाते की, देवी पार्वतीने हे व्रत भगवान शंकरासाठी केले होते. हे व्रत करताना त्यांनी अरण्यात जाऊन याची पूजा केली होती.

Hartalika Fast 2022
Modak Recipe : उकडीचे मोदक बनवायचे आहे? कळ्या पाडताना तुटतात, या सोप्या टिप्सची मदत घ्या

या दिवशी महिला महिला देवी पार्वती व शंकराची पूजा करतात. महिलांनी या दिवशी उपवास ठेवून संध्याकाळी पाणी व अन्नाचे ग्रहण करणे अपेक्षित आहे परंतु, काही स्त्रिया या गणपतीची स्थापना झाल्यानंतर हे व्रत सोडतात.

अरण्यात पाणी (Water) व कंदमूळे मिळत असल्यामुळे देवी पार्वतींने पूजा संपन्न झाल्यानंतर यांचे सेवन केले. हा पूजेत कोणताही पदार्थ चावला किंवा गिळला जात नाही. त्यासाठी हे व्रत कडक केले जाते.

Hartalika Fast 2022
Hartalika 2022 : हरतालिकेचे व्रत पहिल्यांदा करताय ? जाणून घ्या, पूजेची विधी व साहित्य

या व्रतामध्ये पाणी, दूध किंवा ज्यूसचे सेवन आपण करु शकतो. तसेच गोड पदार्थांचे सेवनही करता येईल. त्या गोड पदार्थांचे सेवन करताना ते उपवासाचे असतील याची खात्री करा. रताळ्याची किंवा साबुदाण्याची खीर असे पदार्थ आपण खाऊ शकतो. परंतु, या पदार्थांचे सेवन हे हरतालिकेची पूजा झाल्यानंतरच खाऊ शकतो. यादिवशी दिवसभर उपवास केला जातो.

तसेच या दिवशी तेलाचे (Oily) किंवा तिखट पदार्थ खाऊ नये. मिठाचे सेवन देखील करु नये. या दिवशी पचायला हलके व अँसिडिटीची त्रास होणार नाही अशा पदार्थांचे सेवन करावे. आपण या दिवशी फळांची कोशिंबीर, भगरीची खीर याचे सेवन करावे. हा उपावास मनोभावे केल्याने आपल्या प्राप्ती होते अशी मान्यता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com