Suit From Old Saree : साडीचा ड्रेस शिवताय? मग टेलरला आधीच 'या' गोष्टी सांगा आणि स्टायलीश सूट मिळवा

Fashion 5 Tips : ड्रेस शिवल्यानंतर तो सर्वात खास आणि मस्त दिसावा यासाठी मुली बरेच प्रयत्न करतात. मात्र नेमका कसा ड्रेस शिवायला हवा हे काहींना समजत नाही.
Fashion 5 Tips
Suit From Old SareeSaam TV

फॅशनच्या दुनीयेत सध्या जुन्या साड्यांपासून ड्रेस शिवण्याचा ट्रेंड सुरु आहे. अनेक मुली आपल्या आईच्या जुन्या साडीपासून मस्त ड्रेस शिवत आहेत. काहीजणी घागरा तर काही जणी प्लाजो सुट परिधान करतात. आता प्रत्येक साडीनुसार त्याचा कसा ड्रेस तयार होईल हे ठरत असतं.

Fashion 5 Tips
Celebrity Fashion: चेहरा न बघताही तुम्ही ओळखाल, अतरंगी अवतारात आली मॉडेल

साडीपासून आपण ड्रेस शिवल्यानंतर तो सर्वात खास आणि मस्त दिसावा यासाठी मुली बरेच प्रयत्न करतात. मात्र नेमका कसा ड्रेस शिवायला हवा हे काहींना समजत नाही. त्यामुळे साडीचा ड्रेस शिवण्याआधी या काही टिप्स नक्की वाचा.

अनारकली ड्रेस

अनाकरली ड्रेस शिवत असताना आधी योग्य साडी निवडा. शक्यतो साडी हेवी एम्ब्रॉयडरी आणि डायमंडपासून भरलेली, मात्र पातळ असेल अशी निवडा. ही साडी टेलरकडे स्टिचिंगसाठी देत असाल तेव्हा त्याला संपूर्ण साडी वापरायला सांगा. तसेच जास्तीत जास्त प्लेट कशा पडतील याकडे लक्ष द्यायला सांगा. साडीचा अनारकली शिवताना त्याला जास्त प्लेट असल्यास हा ड्रेस आणखी सुंदर दिसतो.

प्लाजो ड्रेस

काही मुलींना प्लाजो ड्रेस आवडतात. तुम्हाला देखील साडीपासून हा ड्रेस शिवून हवा असेल तर आधी साडीचं फॅब्रीक तपासा. साडीचं कापड जाड असावं. कारण अशा ड्रेसला अस्तर लावल्यास ते चांगले वाटत नाहीत. त्यामुळे प्लाडो ड्रेस शिवत असताना साडीचं कापड जास्तीत जास्त जाड असल्यास उत्तम. प्लाजोसाठी टेलरला जास्त घेल आणि जास्त प्लेट द्यायला सांगा.

ऑफिस वेअर ड्रेस

साडी कॉटनची असेल किंवा चिकन सिल्कची असेल तर त्यापासून ड्रेस बनवणे सोप्प आहे. त्यासाठी प्लेन किंवा समान डिझाइन असलेली साडी निवडा. त्यानंतर यापासून कुरता आणि सिगारेट पँट बनवून घ्या. असा ड्रेस तुम्ही ऑफिसमध्ये डेली युजसाठी वापरू शकता.

Fashion 5 Tips
Men's Fashion Tips: परफेक्ट पण हटके लूक हवाय? तर ट्राय करा फ्लोरल प्रिंट स्टाईल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com