Jobs Problem : Facebook वरुन जाणार १२ हजार लोकांची नोकरी, झुकेरबर्गचा इशारा !

जगातील सर्वात मोठी सोशल मीडिया कंपनी फेसबुकमधील हजारो लोकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागणार आहेत.
Jobs Crisis
Jobs CrisisSaam Tv
Published On

Jobs Crisis : आपल्या जवळच्या लोकांशी संपर्क साधण्यासाठी किंवा आपल्या मित्र-मैत्रिणींना आपल्या अधिक जवळ आणण्यासाठी आपण दिवसभर सोशल मिडियाचा वापर करतो. फेसबुकचे फेम काही वर्षापूर्वी अधिक होते. सोशल स्टेटसपासून आपण सध्या काय करत आहोत, यासारख्या गोष्टी आपण सहज तिथे अपलोड करतो. (Latest Marathi News)

परंतु, जगातील (World) सर्वात मोठी सोशल मीडिया कंपनी फेसबुकमधील हजारो लोकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागणार आहेत. या मेटामध्ये नोकरी गमावलेल्या लोकांची संख्या किमान 12 हजारांपर्यंत असू शकते असे सांगितले जात आहे. फेसबुकच्या (Facebook) एकूण कर्मचाऱ्यांपैकी हे प्रमाण १५ टक्के आहे. याबाबत सीईओ मार्क झुकेरबर्गचे काय म्हणणे आहे? फेसबुकच्या एका कर्मचाऱ्याने मीडिया कंपनीला याबाबत सांगितले आहे.

Jobs Crisis
Smartphone tips : तुमचा फोन सतत गरम होतोय ? त्याचे नेमके कारण काय?

इनसाइडरच्या रिपोर्टनुसार, कंपनीचे वरिष्ठ अधिकारी Quiet Layoff ची तयारी करत आहेत. याच्यानुसार आपण कामचुकारपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना काढून टाकले जाईल. येत्या काही दिवसातच Facebook Job Cut लागू केला जाईल.

Quiet Layoff म्हणजे काय?

फेसबुकच्या एका कर्मचाऱ्याने इनसाइडरला सांगितले की, सायलेंट लेऑफमधील लोकांना अशा प्रकारे दाखवले जाईल की, कर्मचारी इतर कामामुळे किंवा नोकरीला कंटाळून स्वतः कंपनी सोडत आहेत असे जगाला वाटेल. परंतु, यात कंपनीने त्यांना नोकरीवरुन कमी केलेले असेल. तसेच त्यांनी सांगितलेल्या अहवालानुसार जेव्हा पासून नोकरी जाणार हे बाब कर्मचाऱ्यांना कळाली आहे तेव्हापासून फेसबुकमध्ये काम करणारे कर्मचारी स्वत:ला सिध्द करण्यासाठी अधिक कष्ट करत आहेत. परंतु, त्यानंतरही अनेकांची नोकरी जाऊ शकते असे देखील सांगितले आहे.

Jobs Crisis
Google Chrome Hacking : सावधान ! Google Chrome चा वापर करताय ? हॅक होऊ शकतो तुमचा पर्सनल डेटा

झुकरबर्गने नोकरभरती थांबवण्याचा इशारा दिला

मे महिन्यात पहिल्यांदा मेटा सीईओ मार्क झुकेरबर्गने फेसबुकवर नोकरी भरती थांबवण्याची घोषणा केली. परंतु, तेव्हा हे कंपनीच्या काही विशेष भागांसाठी केले गेले होते. अहवालानुसार, झुकरबर्गने आपल्या कर्मचाऱ्यांना एका कॉलमध्ये सांगितले की, संपूर्ण बोर्डात भरती थांबवली जात आहे. त्यासाठी सध्या झुकरबर्गने बहुतांश विभागात भरती थांबवली आहे. तसेच यादरम्यान, त्यांनी नोकरीवरून अनेकांना काढून टाकण्याच्या त्याच्या योजनेबद्दल अधिक लोकांना सांगून त्यांना अधिक सावध केले.

फेसबुकचे सीईओ म्हणाले की, 'पुढील वर्षापर्यंत लोक कमी करण्याची आमची योजना आहे. ज्यामुळे अनेक वेगवेगळे गट तयार होतील. ज्यामुळे आमचे मनुष्यबळ इतर अनेक क्षेत्रात वळवू शकतो. असे म्हटले जात आहे की, फेसबुकची मूळ कंपनी मेटाने आर्थिक मंदीच्या पार्श्वभूमीवर कॉस्ट कटिंग लागू केली आहे. अनेक कर्मचाऱ्यांना 30 ते 60 दिवसांची नोटीस देण्यात आली आहे जेणेकरून त्यांना दुसरी नोकरी मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com