Facebook Down : फेसबुक अचानक बंद! युजर्सचे लॉग-इन होईना, नेमकं काय घडलं? लगेच क्लिक करून वाचा...

Facebook Login Problem, Downdetector : फेसबुकची सेवा आज अचानक ठप्प झाल्याने भारतासह जगभरातील लाखो युजर्सना लॉग-इन, न्यूज फीड, फोटो-व्हिडिओ पोस्ट आणि मेसेजिंगमध्ये अडचणी येत आहेत. डाऊनडिटेक्टरवर तक्रारींचा पूर आलाय.
Facebook Login Problem, Downdetector
Facebook Login Problem, Downdetector
Published On

Facebook Down Meta Server Issue : जगभरातील लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'फेसबुक'ची (Facebook) सेवा आज दुपारी अचानक ठप्प झाली. भारतासह जगभरातील कोट्यवधी युजर्सनी फेसबुक अकाऊंट लॉग-इन करण्यात आणि ते वापरण्यात अडचणी येत असल्याच्या तक्रारी केल्या आहेत. डाऊनडिटेक्टर (Downdetector) या वेबसाईटच्या माध्यमातून ही माहिती समोर आली आहे.

'फेसबुक' (Facebook) अचानक ठप्प झाल्यामुळे जगभरातील हजारो युजर्सना मोठ्या तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेकांना आपले अकाऊंट लॉग-इन करता येत नाही. तर काहींना न्यूज फीड रिफ्रेश करण्यात, फोटो-व्हिडिओ पोस्ट करण्यात आणि मेसेज पाठवण्यात अडचणी येत आहेत.

Facebook Down
Facebook DownSaam TV Marathi
Facebook Login Problem, Downdetector
Accident : महामार्गावर अपघाताचा थरार, कार आणि ट्रकची जोरात धडक, चौघांचा जागीच मृत्यू
Facebook Down
Facebook Down

इंटरनेट सेवांवर लक्ष ठेवणाऱ्या 'डाऊनडिटेक्टर' (Downdetector) या वेबसाईटने याबाबतची माहिती दिली आहे. त्यानुसार, आज अचानक फेसबुकच्या सेवेबाबत तक्रारींमध्ये मोठी वाढ झाली. फक्त भारतातच नव्हे, तर जगभरातील अनेक देशांमधील युजर्सनी फेसबुक काम करत नसल्याचे सांगितले. अचानक आलेल्या या तांत्रिक बिघाडामुळे (Outage) युजर्समध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

अनेक युजर्सनी एक्स सारख्या इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपली नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. फेसबुकची मूळ कंपनी 'मेटा' (Meta) कडून या समस्येचे कारण अद्याप स्पष्ट करण्यात आले नाही. पण ही तांत्रिक अडचण लवकरात लवकर दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे समजते.

Facebook Login Problem, Downdetector
बिल्डिंगमध्ये इलेक्ट्रिक वाहने चार्जिंगला लावता येतात का? नियम काय सांगतो; तज्ज्ञांनी सोप्या शब्दात सर्व सांगितलं

तुम्हालाही फेसबुक वापरताना अडचण येतेय?

जर तुमच्याही मोबाईलमध्ये, लॅपटॉवर फेसबुक चालत नसेल, तर घाबरून जाण्याचे किंवा गोंधळून जाण्याचे अजिबात कारण नाही. फेसबुकची ही समस्या वैयक्तिक नसून सर्व्हर-संबंधित (Server Issue) आहे. त्यामुळे काही वेळ शांत राहणे हाच सर्वोत्तम पर्याय आहे. अनेकदा युजर्सना वाटते की त्यांचे अकाऊंट हॅक झाले आहे आणि ते पासवर्ड बदलू लागतात. पण सध्या असे काहीही करण्याची गरज नाही. ॲप वारंवार बंद करून चालू केल्याने किंवा ते अनइन्स्टॉल केल्याने हा प्रश्न सुटणार नाही. मेटा (Meta) कंपनीकडून सर्व्हरमधील तांत्रिक बिघाड दुरुस्त केला जात असून, काही वेळातच तुमची फेसबुक सेवा पहिल्यासारखी व्यवस्थित सुरू होईल.

Facebook Login Problem, Downdetector
लग्नापूर्वीचे शारीरिक संबंध म्हणजे 'व्यभिचार' नाही, कोर्टाचा पतीला मोठा झटका; पोटगीबाबत महत्त्वाचा निर्णय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com