Face pimple cancer : चेहऱ्यावरील एक छोटा फोड असू शकतो कॅन्सरचं संकेत; 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

Skin cancer : तुमच्या चेहऱ्यावर एकाच ठिकाणी वारंवार पिंपल येत असतील तर सावध व्हा. जर यामधून हलक्या स्पर्शानेही रक्त येत असेल तर हा किरकोळ मुरुम नसून त्वचेच्या कर्करोगाचे प्रारंभिक लक्षण असू शकते.
Face pimple cancer
Face pimple cancer SAAM TV
Published On

कुठेही बाहेर जायचं असेल आणि चेहऱ्यावर पिंपल आली की लगेच मुलींचा मूड ऑफ होतो. तुमच्याही बाबतीत असं घडलं असेल. मात्र तुम्हाला सतत चेहऱ्यावर पिंपल येतात का? जर तुमच्याही चेहऱ्यावर सतत पिंपल येत असतील आणि तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करत असाल तर सावध व्हा.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, जर तुम्हाला एकाच ठिकाणी सतत पिंपल येत असेल आणि त्याला हात लावताच त्यामधून रक्त येत असेल तर त्याला साधारण पूरळ समजू नका. हे त्वचेच्या कॅन्सरचं लक्षण असू शकतं. डॉ. डॅनियल सुगई यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामच्या व्हिडीयोमध्ये अशा लक्षणांकडे दुर्लक्ष करणं जीवघेणं ठरू शकतं असं म्हटलंय.

डॉ. सुगई यांच्या सांगण्याप्रमाणे, बेसल सेल कार्सिनोमा (Basal Cell Carcinoma - BCC) हा त्वचेच्या कॅन्सरचा एक सामान्य प्रकार मानला जातो. याची लक्षणं मोठी जखम किंवा गाठीच्या स्वरूपात दिसून येत नाही. ती एक लहान फोड, मुरुम किंवा त्वचेमधील बदल देखील असू शकतो जो बरा होत नाही.

डॉ. सुगई म्हणाले की, माझ्याकडे येणारे रूग्ण सांगतात की, चेहरा धुताना त्याच्या चेहऱ्यावरून नेहमी एका ठिकाणाहून रक्त येत असतं. हा पिंपल छोटा असला तरीही पुन्हा फुटतो. हे स्किन कॅन्सरचं एक मोठं लक्षण असू शकतं. जर पिंपल चार आठवड्यांपेक्षा जास्त वेळ राहिला आणि गेला नाही तर डॉक्टरकडून वेळीच त्याची तपासणी करून घ्या.

Face pimple cancer
Cancer Treatment: बेकिंग सोड्याने खरंच कॅन्सर बरा होतो? व्हायरल झालेल्या दाव्यामध्ये किती तथ्य, पाहा

डार्क स्किन असलेल्या लोकांना मिळतात वेगळे संकेत

ज्या व्यक्तींची त्वचा अधिक गडद त्या व्यक्तींमध्ये BCC बहुतेकदा रंगद्रव्य स्वरूपात दिसून येतं. ज्यामध्ये थोडा लाल रंग देखील असू शकतो. कालांतराने, हा पिंपल वाढतो आणि सहज रक्तस्त्राव होऊ लागतो.

लवकर निदान होणं गरजेचं

डॉ. सुगाई यांनी एका केसबाबत माहिती दिली. ते म्हणाले, ज्यामध्ये एक सामान्य दिसणारा डाग प्रत्यक्षात त्वचेचा कॅन्सर असल्याचं दिसून आलं. त्याने डर्माटोस्कोपने त्याची तपासणी केली आणि त्याला 'झाडासारख्या रक्तवाहिन्या आणि व्रण' दिसले, जी कॅन्सरची लक्षणं मानली जातात.

Face pimple cancer
Obesity: धक्कादायक! देशभरातील ४५% किशोरवयीन मुलांमध्ये लठ्ठपणाची समस्या; पाहा कोणत्या कारणांमुळे वाढतोय पोटाचा घेर

सूर्यकिरण सर्वात मोठं कारण

डॉक्टरांनी सांगितलं की, त्वचेच्या कॅन्सरचं मुख्य कारण म्हणजे यूव्हीबी आणि यूव्हीए किरणं असतात. फक्त ५ पट जास्त उन्हाचा त्रास झाला तरी त्वचेच्या कॅन्सर धोका अनेक पटींनी वाढतो. त्यामुळ प्रत्येकाने सनस्क्रीन वापर केलाच पाहिजे.

Face pimple cancer
Earwax accumulation : कानात सतत घाण का जमा होते? कान साफ करण्याची घरगुती आणि सोप्या पद्धती

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com