Summer Camping Destinations: समर ट्रिपला घ्या कॅम्पिंगचा आनंद, ही ठिकाणे ठरतील बेस्ट !

Camping In Summer: जसजसा उन्हाळा जवळ येतो तसतसे लोक सुट्टीवर जाण्याचा विचार करू लागतात.
Summer Camping
Summer CampingSaam Tv
Published On

Summer Camping Tips: जसजसा उन्हाळा जवळ येतो तसतसे लोक सुट्टीवर जाण्याचा विचार करू लागतात. हा ऋतू मुलांसाठी खुप खास असतो. या ऋतूमध्ये प्रत्येकाला आपल्या व्यस्त जीवनापासून दूर राहून थोडा निवांत वेळ घालवायचा असतो. लोक सहसा भेट देण्यासाठी अशी ठिकाणे निवडतात, ज्यामुळे त्यांना उष्णता आणि गर्दीपासून दूर शांतता वाटते.

सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने अनेकजण भारतातील (Indian) विविध ठिकाणच्या हिल स्टेशनला (Station) भेट देण्यासाठी जात असतात. तसेच तुम्ही देखील उन्हाळ्याच्या दिवसांत बऱ्याच ठिकाणी भेट देत असाल थंडगार हवेचा आनंद घेऊ शकता. त्याच वेळी, असे बरेच लोक आहेत ज्यांना कॅम्पिंगची खूप आवड असते.

Summer Camping
Offbeat Destination In Summer : उन्हाळ्याच्या सुट्टीत फिरण्यासाठी ही ठिकाणे ठरतील बेस्ट

विशेषतः मुलांसाठी (Children) हा एक रोमांचकारी अनुभव आहे. तुम्हीही उन्हाळ्यात (Summer) कॅम्पिंगसाठी उत्तम पर्याय शोधत असाल, तर अशा काही ठिकाणांबद्दल आता आपण जाणून घेऊया जिथे तुम्ही तुमची परिपूर्ण सुट्टी घालवू शकत नाही पण कॅम्पिंगचा आनंदही घेऊ शकता. तर जाणून घेऊया

Sonmarg
SonmargCanva

सोनमर्ग -

पृथ्वीचा स्वर्ग म्हटल्या जाणाऱ्या काश्मीरमध्ये दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक पोहोचतात. सोनमर्गला 'मेडो ऑफ गोल्ड' असे म्हणतात. हिमवर्षावामुळे हिवाळ्यात राष्ट्रीय महामार्ग १ डी बंद केलेला असतो, त्यामुळे हिवाळ्यात सोनमर्गला भेट देणे दुर्लभ असते.

सोनमर्गहून हिमाच्छादित पर्वतशिखरांचे दर्शन डोळ्यांचे पारणे फेडणारे असते. पण जर तुम्ही काश्मीरमध्ये कॅम्पिंगसाठी योग्य ठिकाण शोधत असाल तर सोनमर्ग तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरेल. उन्हाळ्यात येथील हवामान (Weather) खूप चांगले असते. तुम्ही येथे कॅम्पिंगचा आनंद घेऊ शकाल.

Summer Camping
Offbeat Places : जानेवारीच्या विकेंडला एक्सप्लोर करा 'या' 5 ऑफबीट जागा!
Solang valley
Solang valleyCanva

सोलांग व्हॅली -

हिमाचल प्रदेश नेहमीच लोकांची पहिली पसंती असते. नैसर्गिक सौंदर्यासाठी हे राज्य जगभर प्रसिद्ध आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्ही हिमाचलमध्ये उन्हाळ्यात कॅम्पिंगसाठी पर्याय शोधत असाल, तर तुम्ही येथे असलेली सोलांग व्हॅली निवडू शकता. येथे पर्यटन हंगाम 12 महिने चालतो. त्यामुळे जर तुम्ही उन्हाळ्यात हिमाचल किंवा मनालीला जात असाल तर सोलांग व्हॅलीमध्ये कॅम्पिंगचा नक्कीच आनंद घ्या.

Chandratal Lake
Chandratal LakeCanva

चंद्रताल तलाव -

उन्हाळ्यात कॅम्पिंगसाठी हिमाचल प्रदेशातील चंद्रताल तलावावरही जाता येते. उन्हाळ्याच्या सुट्ट्या घालवण्यासाठी योग्य ठिकाण. येथील सौंदर्य आणि उत्कृष्ट हवामानामुळे येथे दरवर्षी मोठ्या संख्येने लोक कॅम्पिंगसाठी येतात.

Summer Camping
Charging Led Bulb In Summers : उन्हाळ्यात लाईट गेल्यावर प्रकाश देतील हे चार्जिंग बल्ब, मिळेल 12 वॅट इतकी पावर
Mussoorie
MussoorieCanva

मसुरी -

जर तुम्ही दिल्लीत राहत असाल आणि तुम्हाला लांब प्रवास करायला वेळ नसेल तर तुम्ही मसुरीला जाऊ शकता. दिल्लीपासून जवळ असल्याने येथे पोहोचणे खूप सोपे आहे. तुम्ही इथे कमी वेळेत सहज पोहोचू शकता आणि उन्हाळ्यात उत्तम कॅम्पिंगचा आनंद घेऊ शकता.

Spiti Valley
Spiti ValleyCanva

स्पिती व्हॅली -

हिमाचल प्रदेशातील स्पिती व्हॅली हे थंड वाळवंट आहे, जिथे कडक उन्हातही थंडी जाणवते. 12500 फूट उंचीवर असलेली ही दरी चारही बाजूंनी हिमालयाने वेढलेली आहे. येथील सुंदर दृश्ये आणि निसर्गसौंदर्यामुळे अनेक पर्यटक येथे पोहोचू लागले आहेत. अशा परिस्थितीत आता अनेक कंपन्या येथे तळ ठोकून आहेत.

Summer Camping
Puneri Patya | पुणेरी पाट्या कोणी सुरू केल्या? पाहूयात या मागची कहाणी

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com