Offbeat Places : जानेवारीच्या विकेंडला एक्सप्लोर करा 'या' 5 ऑफबीट जागा!

जानेवारी या थंडीच्या महिन्यात विकेंडला सर्वांचेच फिरण्याचे प्लॅन बनत असतात.
Offbeat Places
Offbeat Places Saam Tv
Published On

Offbeat Places : जानेवारी या थंडीच्या महिन्यात विकेंडला सर्वांचेच फिरण्याचे प्लॅन बनत असतात. ज्यांना प्रवास करण्याचा छंद आहे त्यांना प्रत्येक ठिकाण एक्सप्लोर करण्याची उत्सुकता असते आणि जर शांततेच्या ठिकाणी आपला दिवस घालवायचा असेल तर ऑफबीट शिवाय दुसरा उत्तम पर्याय नाही.

जानेवारी मध्ये मिळणाऱ्या विकेंडला एक्सप्लोर करा भारतातील काही मजेदार ऑफबीट जागा.

जीभी (Jibhi) -

जीभी हे गाव हिमालयन नॅशनल पार्कपासून फक्त एक तासाच्या अंतरावार आहे, येथे तुम्ही अगदी सहज गाडीने पोहोचू शकता. नॅशनल पार्कपासून जीभीपर्यंतचा प्रवास तुम्ही कधीच विसरू शकणार नाही. तुम्हाला या प्रवासादरम्यान अनेक निसर्गरम्य दृश्य पाहाता येतील. तसं पाहायला गेलं तरतुम्ही येथे फक्त बसून निसर्गाचा आनंद घेऊ शकता.

Offbeat Places
Destinations For Solo Travel : सोलो ट्रिपसाठी जगभरातील 'ही' ठिकाणे आहेत निसर्गरम्य !

मेचुका (Mechuka) -

मेचुका समुद्रापासून 6000 फूट उंचीवर वसलेले एक छोटे शहर आहे. हे अरुणाचल प्रदेशात या राज्यातील शहर आहे.तेथे मोठे मोठे डोंगर,जंगल आहेत नैसर्गिक सौंदर्य लाभलेले शहर आहे हिवळ्यात इथे चारी बाजूला बर्फ दिसतो. घोडस्वारी, टेरेकिंग करू शकतो.

तवांग (Tawang) -

हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे बोद्ध मठ आहे.जानेवारी ऑफबीट म्हणून भेट देण्यासाठी ही जागा खूप सुंदर आहे.इथे ३ मार्केट प्रसिद्ध आहेत पुराना बाजार,नेहरू बाजार आणि नया बाजार इ.

Offbeat Places
Beach Wedding Destinations : बीच वेडिंगसाठी डेस्टिनेशन शोधताय ? 'ही' आहेत सर्वोत्तम ठिकाणे

लंबासिंगी (Lambasingi) -

पर्यटनाच्या दृष्टीने पाहता तसे काही इथे पाहण्यासारखे काही नसले, तरी तुम्हाला एका शांत सुट्टीचा अनुभव घ्यायचा असेल, निरभ्र चांदण्यांनी भरलेल्या आकाशाखाली कॅम्पफायर एंजॉय करायचं असेल किंवा आपल्या कुटुंबासोबत क्वालिटी टाईम व्यतीत करायचं असेल तर कॉफीच्या मळ्यांनी वेढलेला हा परिसर नक्कीच उत्तम पर्याय आहे.

खोनोमा (Khonam) -

हे गाव नागालँड मध्ये आहे. फिरण्यासाठी अतिशय सुंदर ठिकाण आहे,येथील जंगले आणि कृषी साठी हे फेमस आहे आणि विपश्यना, फोटोग्राफी, कॅम्पिंग,नेचर वॉक यासाठी हे एक उत्तम पर्याय आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com