Packaged Flour Harmful For Health: सावधान! पॅकेट बंद पीठ खाताय ? 'या' आजारांना पडू शकता बळी

Packaged Flour: प्रत्येकाच्या आहारात चपाती,भाकरी या पदार्थांचा हमखास समावेश असतो,परंतू आजकाल बाजारात बनावट ,निकृष्ठ आणि भेसळयुक्त पीठ विकले जात आहे.
Packaged Flour
Packaged Floursaam digital
Published On

Packaged Flour

प्रत्येकाच्या आहारात चपाती,भाकरी या पदार्थांचा हमखास समावेश असतो,परंतू आजकाल बाजारात बनावट ,निकृष्ठ आणि भेसळयुक्त पीठ विकले जात आहे. त्यातच आधीच्या काळात जेवण अगदी वेगळे होते. अन्नाची चव फार छान असायची की त्याची शुद्धता तपासण्याची गरजच भासत नसे मात्र आजच्या काळात खाद्यपदार्थांमध्ये भेसळ वाढत आहे. अनेक दुकानदार त्यांच्या ग्राहकांना अनेकवेळा निकृष्ट वस्तू विकतात आणि ते खाल्ल्याने शरीरावर वाईट परिणाम होतो,अशा परिस्थित आरोग्यासाठी फायदेशीर असलेले पीठ कोणते खावे असा आपल्याला प्रश्न पडतो.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Packaged Flour
Money Saving Tips | Lifestyle मध्ये करा हे बदल, पैशांची होईल बचत

शहरांमध्ये प्रत्येकजण कामाच्या धावपळीत असतो त्यांची जीवनशैली ही ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांपेक्षा फार वेगळी असते यामुळे बऱ्याचदा शहरात राहणाऱ्या व्यक्तींना पॅकेटमध्ये मिळणाऱ्या पिठचा वापर करावा लागतो. पण सर्वात आश्चर्यांची गोष्ट म्हणजे जे तुम्ही ब्रेड खात त्याचीही तुमच्या आरोग्यावर हळू हळू वाईट परिणाम जाणवू लागतो.

खरं तर अनेक तज्ञांच्या मते तुम्ही ज्या प्रकारचे धान्य खातात त्याचा थेट परिणाम तुमच्या आरोग्यावर होतो. आजकाल मार्केटमध्ये मिळणाऱ्या पिठात अनेक प्रकारची प्रिझर्व्हेटिव्ह्ज टाकली जातात ज्यामुळे जे धान्यांमध्ये आढळणारे पोषक तत्व पूर्णपणे नष्ट करते.

आरोग्यासाठी घातक

मार्केटमध्ये मिळणारे पॅकेट पीठ इतके बारीक केले जाते की त्यातील सर्व पोषक तत्व पूर्णपणे नष्ट होतात. या पीठात आरोग्यासाठी फायदेशीर असलेले फायबर या पीठात अजिबात नसते.अशा स्थितीत पॅकेटमधील चपाती शरीरासाठी जास्त चांगली नसते. हे पीठ पांढरे आणि चांगले दिसण्यासाठी त्यात निकृष्ट दर्जाचे तांदळाचे पीठ टाकले जाते. पीठ लवकर खराब होऊ नये म्हणून त्यात अनेक केमिकल्सचा वापर केला जातो, पॅकेज केलेले पीठ खाल्ल्याने मधुमेह, लठ्ठपणा आणि पचनाच्या समस्या उद्भवतात. हे आरोग्यासाठी अजिबात चांगले नाही.

प्रत्येक व्यक्तीला आपल्या आरोग्याची विशेष काळजी असते मात्र अशा स्थितीत तु्म्हाला ही तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यायची असेल तर पॅकेट पीठाता आहारात समावेश करण्याऐवजी तु्म्ही मल्टीग्रेन पीठ वापरू शकता पण यातील महत्वाची गोष्ट म्हणजे हे ही पीठ पॅकेट बंद नसावे.अनेकवेळा तुम्ही तुमच्या घराजवळील गिरणीतून पीठ आणू शकता कारण ते चांगले असते. ज्या पीठात कोंडा जास्त असतो ते पीठ पचनासाठी चांगले असते. या पीठात फायबर असल्याने यामुळे लठ्ठपणा नियंत्रणात राहण्यास मदत राहतो.

Packaged Flour
Healthy Lifestyle: रात्री उशीरा जेवल्याने आरोग्य सुधारतं की बिघडतं? जाणून घ्या

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com