कुकर अन् चमचाभर 'ही' पांढरी गोष्ट; तूप तयार करण्याची पाहा सर्वात सोपी पद्धत, मिनिटांत तूप तयार

Secret Ingredient for Quick & Grainy Ghee: घरगुती तूप तयार करण्याची सोपी पद्धत. प्रेशर कूकर अन् बेकिंग सोड्याचा वापर करून घरगुती तूप तयार करा.
Secret Ingredient for Quick & Grainy Ghee
Secret Ingredient for Quick & Grainy GheeSaam
Published On

देशी तूप खाण्याचे अनेक फायदे आहेत. देशी तूप खाल्ल्यानं आरोग्याला अनेक फायदे मिळतात. मात्र, बाजारातील तुपामध्ये भेसळ असण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे घरगुती तूप खाणं केव्हाही उत्तम. घरगुती तूप बनवणं हे अनेकांना वेळखाऊ आणि कटकटीचं काम वाटतं. पण आपण सोप्या टिप्सने घरगुती तूप तयार करू शकता.

यूट्यूबर पूनम देवनानी यांनी तूप तयार करण्यासाठी सोपी टीप शेअर केली आहे. या टीपमुळे दाणेदार तूप तयार होते. शिवाय घरचं तूप म्हटल्यावर आरोग्यासाठीही उत्तम ठरते. घरगुती तूप नेमकं कसे तयार करावे? पाहा खास सोप्या टिप्स.

Secret Ingredient for Quick & Grainy Ghee
प्रसिद्ध कथावाचकाचं अश्लील कांड; कारमध्ये महिलेसोबत शरीरसंबंध ठेवताना रंगेहाथ पकडलं, नागरिकांनी चोप देत शेंडी कापली

सर्वात आधी प्रेशर कुकर गॅसवर ठेवा. त्यात पाणी आणि मलाई घाला. गॅस मंद आचेवर ठेवा. दोन्ही गोष्टी एकत्र केल्यानंतर कुकरचं झाकण लावा आणि कुकरची शिट्टी होऊ द्या. एक शिट्टी झाल्यानंतर झाकण उघडा आणि गॅस मंद आचेवर ठेवून ढवळत राहा. दाणेदार तूप दिसल्यानंतर त्यात १/८ चमचा बेकिंग सोडा घाला. नंतर मिक्स करा.

Secret Ingredient for Quick & Grainy Ghee
डिजिटल होम अरेस्टच्या नावाखाली फसवलं, १ कोटी लुबाडले, पुण्यातील वृद्धाचा हृदयविकारानं मृत्यू

बेकिंग सोड्यामुळे तूप लवकर तयार होते. तूप तयार झाल्यानंतर गॅस बंद करा आणि तूप गाळून घ्या. महत्वाची टीप - एक तास आधी मलाई रेफ्रिजरेटरमधून बाहेर काढा. नंतर त्याचं तूप तयार करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com