Earphone Side Effects : इअरफोनचा अतिवापर ठरु शकतो; आरोग्याला घातक, WHO ने दिला वेळीच थांबण्याचा सल्ला

जे लोक इयरफोन सारख्या उपकरणांचा वापर करतात किंवा मोठ्या आवाजात जास्त वेळ घालवतात ते लवकरच बहिरे होऊ शकतात.
Earphone Side Effects
Earphone Side EffectsSaam Tv

Earphone Side Effects : आपल्या प्रवासातील साथी जर कुणी असेल तर ते इअरफोन्स, इअरबड्स किंवा हेडफोन. याशिवाय काही लोक घराबाहेर पडत नाहीत. काही लोकांसाठी, इयरफोन्स हे आजूबाजूच्या लोकांकडे दुर्लक्ष करण्याचे साधन आहे. काहीही ऐकण्याची गरज नसताना कानात इअरफोन लावून ते आपल्याच विश्वात मग्न होतात. पण तुम्हाला माहित आहे का की, हे इयरफोन तुमच्यासाठी बाहेरील आवाज कायमचे शांत करू शकतात. तुमचे आवडते उपकरण तुम्हाला कायमचे बहिरे बनवू शकते.

नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात असा दावा करण्यात आला आहे की, जे लोक इयरफोन (Earphone) सारख्या उपकरणांचा वापर करतात किंवा मोठ्या आवाजात जास्त वेळ घालवतात ते लवकरच बहिरे होऊ शकतात.

1. स्टडी काय सांगते

BMJ ग्लोबल हेल्थ जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, स्मार्टफोन, हेडफोन आणि इअरबड्स यांसारखी वैयक्तिक श्रवणयंत्रे वापरणाऱ्या 1 अब्जाहून अधिक लोकांना त्यांची श्रवणशक्ती कमी होण्याचा धोका असतो.

2. व्हॉल्यूम पातळी कानांसाठी धोक्याची आहे

पूर्वी प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, बहुतेक लोक इयरफोनमध्ये 105 dB पर्यंत आवाज ऐकतात. मनोरंजनाच्या ठिकाणी सरासरी आवाज पातळी 104 ते 112 dB पर्यंत असते. आवाजाची ही पातळी कानांसाठी हानिकारक आहे.

Earphone Side Effects
Heart Attack : earphones मुळे येऊ शकतो हृदयविकाराचा झटका, जाणून घ्या कारणे

3. कमी आवाजात त्याचा वापर करा

जर तुम्ही नियमितपणे बराच वेळ मोठा आवाजात ऐकत असाल तर तुम्ही तुमच्या कानाला इजा करत आहात. ऐकण्याचे नुकसान टाळण्यासाठी हेडफोनचा आवाज कमी ठेवा.

4. ओव्हर-द-इअर हेडफोन वापरा

ओव्हर-द-इअर हेडफोन्समध्ये, इअरबड्स कानाच्या पडद्यापासून काही अंतरावर असतात. श्रवणशक्ती कमी करण्यासाठी हे अंतर महत्त्वाचे असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

5. आवाज कमी करणारे हेडफोन

अनेकदा तुम्ही इतर आवाज रोखण्यासाठी तुमच्या हेडफोनचा आवाज वाढवता. जे तुमच्या कानाच्या पडद्याला नुकसान पोहोचवते. म्हणूनच आवाज रद्द करणारे हेडफोन वापरणे चांगले. हे तुम्हाला कमी आवाजात चांगला अनुभव देते.

Earphone Side Effects
Child Health Tips : मुलांनी अतीप्रमाणात कुकीज खाल्यास आरोग्यावर होतील 'हे' घातक परिणाम

6. हेडफोनचा वापर कमी करा

हेडफोनचा कमी वापर केल्याने तुमच्या कानाला होणारे नुकसान कमी होऊ शकते. जर तुम्ही तुमच्या दिवसातील बहुतांश वेळ (Time) हेडफोन घालण्यात घालवत असाल तर त्याचा कालावधी कमी करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com