Early cancer symptoms before birth: कॅन्सरची सुरुवातीची लक्षणं जन्माआधीच दिसू शकतात; शास्त्रज्ञांचा मोठा खुलासा

Cancer detection prenatal stage: वैज्ञानिकांनी केलेल्या नवीन संशोधनानुसार कॅन्सरची सुरुवातीची लक्षणे जन्माआधीच दिसू शकतात. हा शोध वैद्यकीय क्षेत्रात मोठी क्रांती घडवणारा ठरू शकतो.
Cancer detection prenatal stage
Cancer detection prenatal stagesaam tv
Published On

केवळ देशात नाही तर संपूर्ण जगभरात कॅन्सरच्या रूग्णांमध्ये वाढ होताना दिसतेय. कॅन्सर होण्यामागे जीवनशैली, पर्यावरण आणि आनुवांशिक घटक कारणीभूत असतात. दरम्यान एका नव्या संशोधानानुसार, असं लक्षात आलंय की, व्यक्तीच्या जन्मापूर्वीच त्याला असलेल्या कॅन्सरचा धोका समजू शकतो.

Nature Cancer या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनात शास्त्रज्ञांनी दोन वेगवेगळ्या एपिजेनेटिक अवस्थांचा अभ्यास केला. या अवस्था सुरुवातीच्या विकासाच्या काळात तयार होत होत्या. एपिजेनेटिक अवस्था म्हणजे आपल्या वागण्यामुळे आणि पर्यावरणामुळे डीएनएच्या मूळ रचनेत बदल न करता जीन कसे काम करतात यामध्ये होणारे बदल.

Van Andel Institute मधील संशोधक सांगतात की, या दोन अवस्थांपैकी एक अवस्थेचा धोका कमी होतो तर दुसऱ्या अवस्थेमध्य कॅन्सरचा धोका जास्त असल्याचं दिसून आलं होतं. ज्या ठिकाणी धोका कमी होता त्या व्यक्तींना लिक्विड ट्यूमर जसं की ल्युकेमिया किंवा लिम्फोमा होण्याची शक्यता जास्त असते. दुसरीकडे जास्त धोका असलेल्या परिस्थितीत व्यक्तींना सॉलिड ट्यूमर जसं की फुफ्फुसाचा किंवा प्रोस्टेट कॅन्सर होण्याची शक्यता जास्त होती.

Cancer detection prenatal stage
Dehydration: तुम्ही दिवसाला अर्धा लिटरपेक्षा कमी पाणी पिताय? तर शरीरावर होतील गंभीर परिणाम, तज्ज्ञांनी नेमकं काय सांगितलं?

बहुतेक कॅन्सर हे उतारवयात होतात असतात. यांचा आनुवंशिक बदलांशी संबंध असल्याचं मानलं जातं. त्यामुळे या अवस्थांचा विकास कसा कॅन्सरचा धोका निर्माण करतो यावर फारसा भर दिला गेला नाही असं डॉ. जे. अँड्र्यू पॉस्पिसिलिक यांनी सांगितलं

त्यांनी पुढे सांगितले की, या दोन वेगवेगळ्या एपिजेनेटिक अवस्थांची ओळख करून आम्ही कॅन्सरचा मूळ कारणांचा अभ्यास केला. यामध्ये Epigenetic errors कॅन्सरचा धोका वाढवू शकतात. एपिजेनेटिक्समधील समस्या cellular quality control सिस्टीमवर परिणाम करतात. ज्यामुळे कॅन्सर वाढवणाऱ्या पेशी टिकून राहतात आणि पसरतात.

Cancer detection prenatal stage
Summer Health: कडक उन्हाळ्यात फक्त पाणी पिऊन चालणार नाही, खा 'हे' पदार्थ अन् राहा हायड्रेटेड

वयानुसार कॅन्सरचा धोका

कॅन्सरचा धोका वयानुसार वाढतो. याचं कारण म्हणजे DNA चं नुकसान होत राहतं. मात्र प्रत्येक असामान्य पेशी कॅन्सरमध्ये रूपांतरित होत नाही. या अभ्यासात शास्त्रज्ञांना असंही दिसून आलं की, Trim28 या जीनचे कमी स्तर असलेल्या उंदरांमध्ये कॅन्सर संबंधित जीनवर दोन वेगवेगळ्या एपिजेनेटिक नमुने दिसून आले. हे नमुने विकासाच्या काळात तयार होतात.

Cancer detection prenatal stage
Cold vs hot water: थंड पाणी की गरम पाणी प्यावं? आरोग्यासाठी नेमकं काय आणि किती फायदेशीर? वाचा

काही लोकांना कॅन्सरची लागण होते तर काहींना होत नाही. एपिजेनेटिक्सवर उपचार करता येतात. संशोधनाच्या निष्कर्षांवरून असं दिसून आलं की, कॅन्सरची मुळं विकासाच्या काळात तयार होऊ शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com