
Solar Eclipse 2023 : 20 एप्रिल रोजी या वर्षातील पहिले सूर्यग्रहण होणार आहे, जे संकरित स्वरूपाचे असेल, 2013 नंतर याप्रकारचे सूर्यग्रहण होणार आहे. हे ग्रहण भारतात दिसणार नसले तरी त्याच्या प्रभावामुळे ग्रहणाचे नियम पाळणे आवश्यक आहे. विशेषत: गर्भवती महिलांनी या सूर्यग्रहणाच्या नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे.
भारतात 2023 चे पहिले सूर्यग्रहण (Surya Grahan) न दिसल्यामुळे, सुतक कालावधी देखील होणार नाही, परंतु गर्भवती महिलांवर त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात, त्यामुळे काही खबरदारी घेणे आवश्यक आहे.
सूर्यग्रहण 2023 ची वेळ या वर्षीचे पहिले सूर्यग्रहण 20 एप्रिल रोजी सकाळी 7:05 वाजता सुरू होईल, खग्रास सकाळी 07:07 वाजता आणि मध्यकाल 9:45 वाजता असेल. सूर्यग्रहणाची समाप्ती दुपारी 12.39 वाजता होईल.
1. सूर्यग्रहण काळात गर्भवती महिलांनी घ्या या गोष्टींची काळजी
ग्रहणाची सावली गर्भात वाढणाऱ्या मुलासाठी अशुभ असते. यामुळे गर्भवती (Pregnant) महिलांनी या दिवशी घरीच राहावे असा सल्ला दिला जातो.
ग्रहण संपल्यानंतर शक्य असल्यास गर्भवती महिलेने स्नान करावे . हे शरीराला हानिकारक आणि नकारात्मक छाया आणि लहरीपासून स्वच्छ करते आणि त्यांचा प्रभाव कमी करते.
गर्भवती महिलांनी सूर्यदेवाची पूजा करावी, ग्रहणाच्या वेळी आदित्य हृदय स्तोत्र, सूर्याष्टक स्तोत्राचे पठण करावे.
यामुळे सकारात्मक ऊर्जा मिळते आणि ग्रहणाचा दोष दूर होतो.
यासोबतच ग्रहण समाप्तीनंतर आणि स्नानानंतर गरोदर महिलांनी दानधर्म अवश्य करावा. दानाच्या शुभ कार्याने ग्रहणाचे दुष्परिणाम कमी होतात.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.