आपण सर्वजण स्वप्न पाहतो. रात्री झोपल्यानंतर आपल्याला पडणारी स्वप्नं ही आपल्याला भविष्यातील घटनांबद्दल सावध करतात. स्वप्न शास्त्रानुसार, काही स्वप्नं ही शुभ असतात तर काही अशुभ मानतात. पण तुम्हाला कल्पना आहे का, स्वप्नशास्त्रात शुभ आणि अशुभ स्वप्नांचं वर्णन केलंय
स्वप्नशास्त्रामध्ये अनेक प्रकारच्या स्वप्नांबाबत विस्तारीत स्वरूपात माहिती देण्यात आली आहे. यावेळी अनेकदा तुम्हाला स्वप्नात अशा गोष्टी दिसतात, ज्यांच्याशी तुमचा फारसा संबंध नसतो. असंच एक स्वप्न म्हणजे, लग्नाबाबत. आपल्यापैकी अनेकांनी स्वतःच्या लग्नाबाबतच स्वप्न पाहिलं असेल. याचा नेमका अर्थ काय आहे, ते जाणून घेऊया.
तुमच्यापैकी अनेकांनी लग्नाबाबत स्वप्न पाहिलं असेल. जर अविवाहित लोकांना लग्नाचं स्वप्न पडलं तर ते त्यांच्यासाठी शुभ मानलं जातं. स्वप्न शास्त्रानुसार, याचा अर्थ असतो की, लवकरच तुम्ही एखाद्या बंधनात अडकले जाणार आहात.
स्वप्न शास्त्रामध्ये असंही म्हटलं गेलंय की, जर तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत लग्नाचं स्वप्न पाहत असाल तर तो तुमच्यासाठी शुभ संकेत असू शकतो. अशावेळी लवकरच तुम्ही तुमच्या पार्टनरसोबतल लग्नबंधनात अडकू शकता.
अनेकदा आपण अनोखळी व्यक्तीसोबत लग्नाचं स्वप्न पाहतो. आपण कोणत्या व्यक्तीशी लग्न करतोय हे आपल्याला माहिती नसतं. स्वप्न शास्त्रानुसारस, असं स्वप्न फार शुभ मानलं जात नाही. याचा अर्थ असा असतो की, तुम्ही तुमच्या जीवनात संतुष्ट नाही आहात.
जर तुम्हाला स्वप्नामध्ये लग्नाची तयार सुरु असल्याचं दिसत असेल तर यावेळी तुम्ही सावध राहिलं पाहिजे. स्वप्न शास्त्रानुसार, याचा अर्थ लवकरच तुमचा मानसिक ताण वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही काळजी घेतली पाहिजे.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती स्वप्न शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.