
ऑफिसमध्ये जायला उशीर झाला की अनेकदा आपण हाताला मिळेल ते कपडे घालून घराबाहेर पडतो. अशा परिस्थितीत कपड्यांचा रंग सोडा साधी त्याला इस्त्री केलीये की नाही हे देखील पाहत नाही. मात्र धी विचार केला आहे का, की तुम्ही कोणत्या दिवशी कोणता रंग घालता, त्याचा तुमच्या मूडवर, दिवसाच्या घडामोडींवर, किंवा अगदी नशिबावरही काही परिणाम होतो का?
बहुतेक वेळा आपण या गोष्टी सहजतेने घेतो. मात्र भारतीय धर्मशास्त्र आणि रंगांचं मानसशास्त्र असं मानतं की प्रत्येक वाराचा एक ठराविक रंग असतो. जो त्या दिवसाच्या ग्रह-ऊर्जेशी जोडलेला असतो. या शास्त्रानुसार, जर योग्य रंग वापरले, तर तुमचा दिवस अधिक सकारात्मक जाऊ शकतो. तर पाहूया, आठवड्याच्या प्रत्येक दिवशी कोणते रंग घालणं शुभ मानलं जातं आणि का.
सोमवार चंद्राचा दिवस मानला जातो. चंद्र हा मनाचा कारक आहे. पांढरा रंग हा शांततेचा, थंडाव्याचा आणि मानसिक स्थिरतेचा प्रतीक मानला जातो. जेव्हा मन अस्थिर वाटतं, विचार खूप चालू असतात, अशावेळी पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केल्याने मनाला शांती मिळते.
हा दिवस मंगळ ग्रह आणि बडावीर, संकटमोचक हनुमानजी यांच्याशी संबंधित आहे. लाल रंग ताकद, आत्मविश्वास आणि धाडसाचं प्रतीक आहे. महत्त्वाच्या कामांसाठी बाहेर पडताना हा रंग प्रेरणा देतो.
बुध हा बुद्धी, संवाद आणि व्यवहारिकतेचा कारक आहे. हिरवा रंग नव्या संधी, शांतता आणि समतोलाचं प्रतीक आहे. नोकरी, व्यवसाय, अभ्यास किंवा महत्त्वाच्या बैठका असतील तर हा रंग उपयोगी ठरतो.
हा दिवस गुरु बृहस्पतीचा मानला जातो. पिवळा रंग ज्ञान, आध्यात्मिक उन्नती आणि समृद्धीचं प्रतीक आहे. धार्मिक कार्य, व्रत, दान किंवा पूजा असते त्या दिवशी हा रंग शुभ मानला जातो.
शुक्र हा प्रेम, सौंदर्य, संपत्ती आणि ऐश्वर्याचा प्रतिनिधी आहे. लक्ष्मी देवीचा दिवस असल्यामुळे, सौम्य आणि आकर्षक रंग परिधान करणं फायदेशीर ठरतं. गुलाबी आणि पांढरे कपडे सौंदर्य, दांपत्य सुख आणि सौख्य वाढवण्याचे प्रतीक आहेत.
शनिवार शनि ग्रहाशी संबंधित आहे. शनि गंभीरता, आत्मनिरीक्षण, कर्म आणि संयमाचे प्रतीक आहे. काळा किंवा गडद निळा रंग वापरल्याने नकारात्मक शक्तींपासून संरक्षण मिळतं, असं मानलं जातं.
सूर्याचा दिवस म्हणजे रविवार. सूर्य आत्मविश्वास, नेतृत्व, उत्साह आणि तेजाचं प्रतीक आहे. केशरी किंवा नारिंगी रंग वापरल्याने दिवसाला उत्साह मिळतो, आत्मसन्मान वाढतो आणि आपल्या सत्त्वगुणांना बळ मिळतं.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.