Sensitive Skin Care In Summer : तुमचीही त्वचा संवेदनशील आहे का? उन्हाळ्यात चुकूनही करू नका या चुका

Skin Care In Summer : जर तुमची त्वचा देखील खूप संवेदनशील असेल तर तुम्ही तुमच्या दिनचर्येत या 6 चुका अजिबात करू नका.
Sensitive Skin Care In Summer
Sensitive Skin Care In SummerSaam Tv

Sensitive Skin Care : जर तुमची त्वचा देखील खूप संवेदनशील असेल तर तुम्ही तुमच्या दिनचर्येत या 6 चुका अजिबात करू नका. कारण त्वचेच्या रुटीनमधील या चुका तुमच्या चेहऱ्याचे सौंदर्य बिघडू शकतात.

हार्श प्रोडक्ट वापरणे -

जर तुमची त्वचा संवेदनशील असेल तर तुम्ही नेहमी सौम्य गोष्टी वापरा. अल्कोहोल आधारित आणि हार्श प्रोडक्ट वापरल्याने तुमची त्वचा (skin) अधिक संवेदनशील होऊ शकते.

Sensitive Skin Care In Summer
Skin Care Routine In Summer : उन्हाळ्यात त्वचेला थंड आणि तजेलदार ठेवायचंय? तर स्किनकेअर रूटीनमध्ये करा पुदिनाचा समावेश

न धुता नवीन कपडे घालणे -

असे नवे कपडे (Cloths) घातले तर संवेदनशील त्वचेची समस्या आणखी वाढू शकते. अशावेळी नवीन कपडे नेहमी कोमट पाण्यात धुवावेत आणि नंतर परिधान करावेत.

गरम पाण्याने आंघोळ करा -

गरम पाण्याने (Water) आंघोळ केल्याने ताजेतवाने होऊ शकतात आणि तुमच्या शरीराचा थकवा कमी होतो, परंतु संवेदनशील त्वचा असलेल्या लोकांनी खूप गरम पाण्याने आंघोळ करणे टाळावे, कारण यामुळे त्यांची त्वचा अधिक संवेदनशील होऊ शकते.

Sensitive Skin Care In Summer
Skin Care Tips : देशी तूपाचे केवळ आरोग्यासाठीच नाहीतर त्वचेसाठीही अनेक फायदेशीर !

झोपण्यापूर्वी चेहरा न धुणे -

तज्ज्ञांनीही मान्य केले आहे की तुम्ही दिवसातून किमान 2 ते 3 वेळा सौम्य साबणाने किंवा फेसवॉशने चेहरा धुवावा आणि विशेषतः रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही तुमचा चेहरा पूर्णपणे धुवावा.

बर्फ वापरणे -

जर तुमची त्वचा संवेदनशील असेल तर तुम्ही बर्फ वापरू नये, कारण यामुळे लालसरपणाची समस्या वाढू शकते आणि बर्फामुळे तुमची त्वचाही मृत होऊ शकते.

Sensitive Skin Care In Summer
Skin Care: चेहऱ्यावरील डाग कसे घालवाल?

त्वचेवर वारंवार स्क्रब करणे -

संवेदनशील त्वचा असलेल्या लोकांनी त्यांच्या त्वचेला वारंवार एक्सफोलिएट करणे टाळावे, कारण यामुळे खाज सुटणे आणि लालसरपणा येऊ शकतो. नेहमी नैसर्गिक (Nature) रसायन मुक्त स्क्रब वापरा.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com