Guruwar Upay: गुरुवारच्या दिवशी उपवास न ठेवताही करा 'ही' कामं; संध्याकाळी केलेले उपाय ठरतील फलदायी
गुरुवारचा दिवस भगवान विष्णूच्या पूजेसाठी अत्यंत शुभ मानला जातो. याशिवाय आज गुरुपौर्णिमेचा दिवस देखील आहे. या दिवशी व्रत केल्याने मनःशांती, आरोग्य, आणि आर्थिक स्थैर्य मिळतं. पण जर काही कारणाने तुम्ही व्रत पाळू शकत नसाल, तरी काही सोपी आणि प्रभावी उपाय तुम्ही करू शकता.
गुरुवारच्या दिवशी ‘या’ गोष्टी नक्की करा
गुरुवार म्हणजे ‘गुरु ग्रहाचा दिवस’ आणि श्री विष्णू आणि बृहस्पती देवाचा विशेष दिवस. चातुर्मासाच्या काळात तर विष्णू पूजेला विशेष महत्त्व असतं. या दिवशी व्रत नसलं, तरी काही नियम पाळल्यास पुण्य मिळतं.
पिवळ्या रंगाचा वापर करा
गुरुवारच्या दिवशी शक्यतो पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केले पाहिजेत. कारण हा रंग भगवान विष्णूंना प्रिय आहे. घरातही पिवळ्या रंगाचे पदार्थ जसं की पुरी, बेसनाचे लाडू, खिचडी, आमटी हे पदार्थ बनवावेत. शक्य असल्यास याच रंगाच्या फुलांनी विष्णूची पूजा करावी. पिवळ्या रंगाचा वापर केल्याने गुरु ग्रहही प्रसन्न होतो आणि नोकरी, शिक्षण, लग्नासारख्या कामांमध्ये यश मिळण्यास मदत होते.
तुळशीला हळदीचं पाणी अर्पण करा
दररोज तुळशीला पाणी घालणं चांगलं असतं. पण गुरुवारच्या दिवशी पाण्यात थोडीशी हळद मिसळून तुळशीवर अर्पण केल्यास श्रीविष्णू अधिक प्रसन्न होतात. हळद ही शुभ असून तुळस भगवान विष्णूचं अत्यंत प्रिय स्वरूप आहे. या दोघांची एकत्र पूजा केल्यास घरातील तणाव, आर्थिक संकटं आणि मानसिक अस्थिरता दूर होते.
हळदीचा तिलक व घरात हळदीचं पाणी शिंपडावं
गुरुवारी हळदीत थोडंसं गंगाजल मिसळून घरातील सर्वांनी कपाळावर तिलक लावावं. या तिलकामुळे सौभाग्य, आरोग्य आणि मानसिक शांती प्राप्त होते. त्याच हळदीचं पाणी मुख्य दरवाज्यावर आणि घरात शिंपडल्यास नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरात सुख-शांती येते.
केळं खाणं टाळा
गुरुवारी केळ्याचं सेवन करणं टाळावं. कारण धार्मिक मान्यतेनुसार केळ्याच्या झाडात श्री विष्णूचा वास असतो. त्यामुळे या दिवशी केवळ पूजेसाठी केळ्याचा वापर करावा. गुरुवारी केळ्याच्या झाडाची पूजा केल्याने घरातील अडचणी, विशेषतः संतानसुख, विवाह, नोकरी अशा गोष्टींमध्ये प्रगती होते.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.