Panic Attack Treatment : चला तर मग जाणून घेऊया पॅनिक अटॅक म्हणजे काय? पॅनिक अटॅक का येतो? तसेच तो टाळण्यासाठी काय करावे या सर्व गोष्टीबद्दल माहिती करून घेऊ. पण तुम्हाला अचानक पॅनिक अटॅक आला तर काय करायचं.
1. पॅनिक अटॅक म्हणजे काय?
पॅनिक अटॅक म्हणजेच मनातील तीव्र भीतीची भावना. तुम्हाला जेव्हा एखाद्या गोष्टीची खूप भिती वाटते, तेव्हा पॅनिक अटॅक येऊ शकतो आणि मनातील भिती हळूहळू वाढू शकते. यादरम्यान तुमचे शरीर प्रतिक्रिया देते त्यामुळे तुम्हाला भरपूर घाम येऊ शकतो, धडधडणारे हृदय आणि श्वास घेण्यास त्रास या समस्या उद्भवतात. जरी पॅनिक अटॅक आरोग्यासाठी (Health) धोकादायक नसेल. तरी वारंवार पॅनिक अटॅक येणे तुमच्यासाठी धोका निर्माण करू शकतो.
2. पॅनिक अटॅक किती धोकादायक आहे
क्लीव्हलँड क्लिनिकच्या मते , जरी पॅनिक अटॅकची लक्षणे धोकादायक नसली तरीही ती खूप भीतीदायक असू शकतात. यामुळे तुम्हाला हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आल्यासारखा वाटू शकतो. तसेच तुम्हाला खूप जीवघेण्या वेदना होऊ शकतात. बहुतेक पॅनिक अटॅक 5 मिनिटांपासून ते अर्ध्या तासापर्यंत टिकतात.
3. पॅनिक अटॅकची कारणे
जेव्हा लोक तीव्र तणाव अनुभवतात तेव्हा ते सहानुभूतीशील मज्जासंस्था सक्रिय करते. मज्जातंतूंचे एक ट्रिगर असते या धोक्याला मानसशास्त्रीय भाषेत fight or flight असे म्हणतात. एपिनेफ्रिन सारखी रसायने सोडते, ज्याला एड्रेनालाईन आणि नॉरपेनेफ्रिन देखील म्हणतात. यामुळे हृदय ओव्हरड्राइव्हमध्ये जाते आणि आपल्याला घाम येतो.
मज्जातंतूंचे आणखी एक ट्रिगर आहे. ज्याला पॅरासिम्पेथेटिक मज्जासंस्था म्हणतात हे शरीराला त्याच्या मूळ स्थितीत परत आणते.
4. यात प्रामुख्याने खालील गोष्टींचा समावेश होतो
1.चिंता किंवा तणावाशी संबंधित विकार
2.मूड विकार
3.फोबिया म्हणजे एखाद्या गोष्टीची भीती
4.मानसिक विकार
5.आघात आणि तणाव (Stress) संबंधित विकार
5. पॅनिक अटॅकची लक्षणे
पॅनिक अटॅक अचानक येतो. क्लीव्हलँड क्लिनिकच्या मते, पॅनिक अटॅकची लक्षणे (Symptoms) सुरवातीच्या 10 मिनिटांच्या आत वाढतात. नंतर काही वेळातच अदृश्य होतात. पॅनीक अटॅकच्या लक्षणांमध्ये पुढील गोष्टी समाविष्ट आहे.
1.छातीत दुखणे
2.हृदय गती वाढणे
3.श्वास घेण्यात अडचण
4.थरथरणे
5.थंडी वाजून येणे
6.मळमळ
7.घाम येणे
8.बोटांमध्ये मुंग्या येणे किंवा सुन्न होणे
9.गुदमरल्यासारखे वाटणे
10.कंट्रोल गमावण्याची भीती
6. पॅनिक अटॅक आल्यावर काय करावे ?
1.रुग्णांसोबत शांत रहा
2.त्यांना काय हवे ते विचार
3.रुग्णांसोबत लहान आणि सोप्या वाक्यात बोला
4.त्यांना स्वतःला दीर्घ श्वास घेण्यास सांगा
5.त्यांना खात्रीने सांगा की ते सुरक्षित आहेत
6.प्रत्येक इनहेलेशन आणि श्वासोच्छवासाठी हळूहळू 5 पर्यंत मोजा.
7.लक्षणे गंभीर असल्यास त्वरित डॉक्टरांना भेटा
7. हे लक्षात ठेवा
पॅनिक अटॅक जीवघेणा नसून तुमच्या मानसिक आरोग्यावर खोलवर परिणाम करू शकतो. त्यामुळे पॅनिक अटॅकच्या बाबतीत तुम्ही रुग्णाला ताबडतोब डॉक्टरांकडे न्यावे. यासाठी तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी बोलणे गरजेचे आहे. या संबंधित योग्य माहिती मिळवून तुम्हाला योग्य उपचार मिळू शकतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.