Silent Attack : ना बीपी, ना शुगर... तरीसुद्धा येतं आहे सायलेंट अटॅक, जाणुन घ्या कारणे

Attack Symptoms : सायलेंट हृदयविकाराचा झटका आता हळूहळू 50 वर्षांखालील लोकांवरही पडत आहे.
Silent Attack
Silent Attack Saam Tv

Silent Attack Symptoms : सायलेंट हृदयविकाराचा झटका आता हळूहळू 50 वर्षांखालील लोकांवरही पडत आहे. नुकताच असाच एक सायलेंट हृदयविकाराचा झटका दिल्लीतून समोर आला आहे.

आजच्या युगात माणसाची जीवनशैली (Lifestyle) अशी बनली आहे की हृदयाच्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे झाले आहे. आता तर तरुणांनाही हृदयविकाराच्या झटक्यासारख्या गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

Silent Attack
Heart Attack Symptoms : हृदयविकाराची 'ही' 5 चिन्हे वेळीच ओळखा, अन्यथा...

बऱ्याचदा हा सायलेंट अटॅक (Attack) जीवघेणा देखील ठरू शकतो. हार्ट अटॅकची एक अशी गोष्ट समोर आली आहे जिने डॉक्टरणा देखील हदरवून ठेवले आहे. दिल्ली येथे राहणारा 14 वर्षीय व्यक्ती एका फॅमिली फंकशनला आपल्या गाडीमधून जात होता. या व्यक्तीला मधुमेह सुद्धा नाही आहे आणि बीपीचा त्रास सुद्धा नाही आहे.

याशिवाय कार चालवताना त्या व्यक्तीला अटॅक आला. त्याच लगबगीत त्या व्यक्तीला एका जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. रुग्णालयामध्ये पोहोचतानाच व्यक्ती बेशुद्ध झाला होता.

Silent Attack
Heart Attack Symptoms : 'या' समस्यांकडे करु नका नजरअंदाज, कधीही येऊ शकतो हृदयविकाराचा झटका

दवाखान्यामधील व्यक्तींनी त्या बेशुद्ध व्यक्तीला लगेचच व्हेंटिलेटरवर ठेवले आणि सीपीआर, आणि अनेक प्रकारचे शॉक ट्रीटमेंट देने सुरू केले. परंतू एवढे करून सुद्धा त्याच्या स्थितीमध्ये फरक नाही पडला. त्या व्यक्तीची स्तीति खालावल्याने त्याला लगेचच इंद्रप्रथ अपोलो या रुग्णालयामध्ये दाखल केलं गेलं.

अपोलोमध्ये कार्डिओलॉजी विभागाचे सीनियर डॉक्टर अमित मित्तल यांनी या केस बद्दल सविस्तर माहिती दिली. अमित मित्तल यांनी सांगितले की, त्या व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये आणल्याबरोबर त्याची एंजॉग्रफी केली गेली. ऍन्जिओग्राफीमध्ये असे समजून आले की, त्या व्यक्तीचे हृदय आणि धमण्या 90 ते 100% ब्लॉक आहेत. लगेचच त्या व्यक्तीची एन्जोप्लास्टी केली गेली.

ही ट्रीटमेंट केल्यानंतर त्या व्यक्तीच्या हृदयाचे ठोके सामान्य प्रमाणात झाले. जेव्हा त्या व्यक्तीला बरे वाटू लागली होते तेव्हा त्याला व्हेंटिलेटर वरून काढले गेले. आता त्या व्यक्तीचे हृदय साठ टक्के चांगले काम करत होते.

डॉक्टर गोयल यांनी असे सांगितले की, अपोलोमध्ये आणल्याबरोबर आमच्यासाठी लवकरात लवकर उपचार करणे अत्यंत गरजेचे होते. एन्जोप्लास्टी करत असताना डॉक्टर त्या व्यक्तीला वारंवार शॉक देत होते. डॉक्टरांनी पुढे असे सांगितले की, कमी वयाच्या व्यक्तीला सायलेंट हार्ट अटॅक सारख्या गंभीर आजाराचा सामना करावा लागू शकतो.

डॉक्टर गोयल यांनी असे सांगितले की, तुमच्या धमन्यांमध्ये 30 ते 40% प्लाक असू शकते. तुमचे कोलेस्ट्रॉल सामान्य असो किंवा नसो, परंतु ताणतणावा सारख्या गोष्टी प्लॉकचे प्रमाण वाढवतात. ज्यामुळे रक्तामध्ये कलॉटची समस्या उद्भवते. असं झाल्याने धमन्यांपर्यंत रक्तप्रवाह थांबला जातो.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com