Guruwar che Upay: गुरुवारच्या दिवशी करा 'हे' ५ उपाय; घरात येईल धन-समृद्धी

Thursday remedies for wealth: गुरुवार हा देवगुरु बृहस्पती म्हणजेच गुरु ग्रह आणि भगवान विष्णूंना समर्पित आहे. या दिवशी केलेली पूजा, दानधर्म आणि शुभ कार्ये विशेष फलदायी मानली जातात.
Thursday remedies for wealth
Thursday remedies for wealthsaam tv
Published On
Summary
  • गुरुवार हा हिंदू धर्मात अत्यंत शुभ दिवस मानला जातो आणि बृहस्पति, विष्णू आणि लक्ष्मी मातेच्या पूजनासाठी विशेष महत्त्व आहे.

  • गुरुवारी पिंपळाच्या झाडाला तुपाचा दिवा लावून 7 प्रदक्षिणा घालणे आर्थिक अडचणी दूर करण्यास मदत करते.

  • धार्मिक ग्रंथांचे वाचन करणे, विशेषत: भागवत गीता, वेद, उपनिषद, यामुळे ज्ञान, एकाग्रता आणि अभ्यासात सातत्य लाभते.

हिंदू धर्मात आठवड्याच्या प्रत्येक दिवसाला एक विशिष्ट धार्मिक महत्त्व देण्यात आलेलं आहे. त्यातही गुरुवारचा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी बृहस्पति देव, श्रीहरि विष्णू आणि लक्ष्मी मातेच्या पूजनासाठी खास मानला जातो. धार्मिक शास्त्रांनुसार, गुरुवारी योग्य पद्धतीने पूजा, उपाय आणि सेवा केली तर अशक्य वाटणारी कामं देखील शक्य होऊ लागतात.

ज्योतिष्य तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, गुरुवारच्या दिवशी काही खास उपाय करणं तुमच्या फायद्याचं ठरणार आहे. हे ५ सोपे पण प्रभावी उपाय तुमच्या नशिबाला नशिबाला दिशा देतात. यामुळे तुमच्या मनाला शांती मिळून आणि आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होते. हे उपाय कोणते आहेत ते जाणून घेऊया.

पिंपळाच्या झाडाची पूजा करा

गुरुवारच्या संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली शुद्ध तुपाचा दिवा लावा आणि झाडाभोवती ७ प्रदक्षिणा घाला. धार्मिक ग्रंथांनुसार, पीपळाच्या झाडामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महादेव या त्रिदेवांचा वास असतो. याचबरोबर, गुरूंनी देखील यामध्ये वास केलेला असतो. ही पूजा केल्याने घरातील आर्थिक अडथळे दूर होण्यास मदत होते.

धार्मिक ग्रंथांचं वाचन करा

गुरुवार हा ज्ञान प्राप्तीचा अत्यंत उत्तम दिवस मानला जातो. या दिवशी भागवत गीता, वेद, उपनिषद, किंवा अन्य कोणताही धार्मिक ग्रंथ वाचा किंवा त्याचा अभ्यास करा. विद्यार्थ्यांनी त्यांच्या पुस्तकांची पूजा करून दिवसाची सुरुवात केली तर लक्ष वाढतं आणि अभ्यासात सातत्य राहतं.

Thursday remedies for wealth
Dashank Yog: 30 वर्षांनंतर न्यायाधीश शनी बनवणार अद्भुत योग; 'या' राशींना होणार धनलाभ

सरस्वती देवीची आराधना

ज्ञानाची देवी माँ सरस्वतीची पूजा गुरुवारी करणं खूप शुभ मानलं जातं. पूजा करताना पांढऱ्या फुलांचा आणि पिवळ्या रंगाच्या मिठाईचा नैवेद्य अर्पण करा. सरस्वती स्तोत्र किंवा सरस्वती मंत्रांचे पठण केल्यास एकाग्रता, लक्ष आणि स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. विद्यार्थ्यांसाठी त्याचप्रमाणे संशोधक, लेखक, कलाकार यांच्यासाठी हा उपाय विशेष उपयुक्त ठरतो.

पिवळ्या वस्तूंचं दान करा

गुरुवारच्या दिवशी पिवळ्या रंगाशी संबंधित वस्तूंचं दान करणं खूप फलदायी मानलं जातं. यामध्ये पिवळी फुलं, पिवळी मिठाई, बेसनाचे लाडू, चण्याची डाळ, केशर अशा वस्तूंचा समावेश असतो. पिवळा रंग हा बृहस्पति ग्रहाशी संबंधित असल्यामुळे या रंगाच्या वस्तूंमुळे धनलाभ, सौख्य, समृद्धी आणि सौभाग्य वाढते.

Thursday remedies for wealth
Mangalwar che Upay: करियर किंवा बिझनेसमध्ये अडचण आहे? मंगळवारच्या दिवशी करून घ्या हे उपाय

सेवा करा

गुरुवारच्या दिवशी कोणत्याही गरजू किंवा वृद्ध व्यक्तीची सेवा करा. घरातील मोठ्यांचा आशीर्वाद घ्या. मनात जर कोणाबद्दल राग, मत्सर किंवा कटुता असेल तर त्याला बाजूला ठेवा. सर्वांना क्षमा करा आणि स्वतःही क्षमा मागा. यामुळे तुमचं मन शांत होतं आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा येते.

Thursday remedies for wealth
Sawan Budhwar Upay : श्रावणातील बुधवारी करा 'हे' सोपे उपाय; गणपती बाप्पा सोबत शंकराचाही मिळेळ आशीर्वाद
Q

गुरुवारच्या दिवशी कोणत्या देवतांची पूजा करणे शुभ मानले जाते?

A

रुवारी बृहस्पति देव, श्रीहरि विष्णू आणि लक्ष्मी माता यांची पूजा करणे शुभ मानले जाते

Q

पिंपळाच्या झाडाला दिवा लावण्याचा फायदा काय आहे?

A

पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावून प्रदक्षिणा घातल्याने घरातील आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होते .

Q

गुरुवारी कोणत्या ग्रंथांचे वाचन करणे फायदेशीर आहे?

A

भागवत गीता, वेद, उपनिषद किंवा इतर धार्मिक ग्रंथांचे वाचन करणे ज्ञान आणि एकाग्रता वाढवण्यासाठी फायदेशीर आहे.

Q

सरस्वती देवीची पूजा कशासाठी फायदेशीर आहे?

A

सरस्वती देवीची पूजा विद्यार्थी, लेखक, कलाकार आणि संशोधकांसाठी लक्ष, एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर आहे.

Q

गुरुवारी कोणत्या रंगाच्या वस्तूंचे दान करणे चांगले मानले जाते?

A

गुरुवारी पिवळ्या रंगाच्या वस्तूंचे दान (जसे बेसनाचे लाडू, चण्याची डाळ, पिवळी फुले) धनलाभ आणि समृद्धीसाठी चांगले मानले जाते.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com