Belly Fat : बेली फॅट दिवसेंदिवस वाढत आहे; आजपासूनच आहारात करा हे बदल

Health Tips : लठ्ठपणा कमी करण्यासाठी आहारात कोणता बदल केला पाहिजे. कोणते पदार्थ आवर्जून खाणे बंद केले पाहिजे याची माहिती आज जाणून घेणार आहोत.
Saam TV
Belly FatSaam TV
Published On

लठ्ठपणा ही अनेक व्यक्तींसाठी एक मोठी समस्या झाली आहे. ज्या व्यक्तीचे वजन वाढते त्यांना चालणे, उठणे आणि बसणे सर्वच कठीण होते. सतत काही ना काही काम केल्याने थकवा येतो. लठ्ठ व्यक्तीला हवे तसे कपडे परिधान करता येत नाहीत. त्यांच्या मापाचे कपडे सुद्धा जास्त महाग मिळतात. त्यामुळे चार माणसांत जाता येता येत नाही. त्यामुळे व्यक्ती डिप्रेशनमध्ये देखील जातात.

Saam TV
Health Tips: काळा तांदूळ तुम्ही खाल्लाय का? होतात आश्चर्यकारक फायदे

लठ्ठपणा का येतो तर त्याचं एकमेवर कारण आहे तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयी. तुम्ही काय खाता, काय पिता या सर्वांवर बेली फॅट अवलंबून असते. सध्या प्रत्येक व्यक्ती तासंतास लॅपटॉपवर काम करतात. त्यामुळे स्वत:साठी घरगुती जेवण बनवण्यास वेळ नसतो. त्यामुळे अशा व्यक्ती बाहेरून विविध पदार्थ खरेदी करतात आणि सेवन करतात. याने शरीरात फॅट तयार होतं. हे सर्व फॅट थेट आपल्या पोटावर बेली फॅट स्वरूपात जमा होतं.

या चुकांमुळे बेली फॅट वाढतं

जास्तप्रमाणात साखरेचं सेवन

साखर जास्त असलेले पेय, सरबत आणि मिठाई जास्तीत जास्त खाल्याने शरीरातील इंसुलिनचं प्रमाण आणखी वाढतं. यामुळे पोटावरील चरबी जास्त वाढत जाते.

रिफाइंड कर्बोहायड्रेट पदार्थांचं सेवन

ज्या व्यक्ती रिफाइंड कर्बोहायड्रेट पदार्थांचं सेवन करतात त्यांना देखील बेली फॅट वाढतं. यामध्ये सफेद ब्रेड, पास्ता आणि रिफाइंड पिठाचा समावेश असतो. असे पदार्थ खाल्ल्याने त्याने आपल्या पोटावरील चरबी जास्त वाढते.

कमी प्रोटीन असलेले पदार्थ

काही व्यक्ती योग्य आहार घेत नाहीत. आहारातील पदार्थांमध्ये मेटाबॉलिज्म कमी असतं. त्यामुळे फॅट बर्न होण्याची क्रिया कमी होत जाते.

सतत स्नॅक्सचे सेवन

काही व्यक्ती सतत आपल्या आहारात स्नॅक्सचं सेवन करतात. कायम फायबर आणि फॅट्स जास्त असलेले स्नॅक्सचे सेवन केल्याने पोटावरील चरबी वाढतच जाते.

जास्त खारट पदार्थ खाणे

मीठ आपल्या जेवणात विविध पदार्थांची चव वाढवते. मात्र जास्त मीठ खाणे चांगले नाही. शरीरसाठी मीठ घातक आहे. मीठ म्हणजेच सोडिअमने शरीर आणखी जास्त फुलतं.

रात्री उशिरा जेवणे

काही व्यक्तींना रात्री उशिरा जेवण्याची सवय असते. रात्री उशिरा जेवण केल्याने अन्न पचत नाही. जेवून काही व्यक्ती लगेचच झोपतात. त्यामुळे अशा व्यक्ती लठ्ठ होतात.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Saam TV
Health Tips: पाण्यात हे पदार्थ मिसळा; आरोग्याला मिळतील जबरदस्त फायदे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com