Blood Pressure : आजपासून 'हे' पदार्थ खाणे पूर्णत: बंद करा; अन्यथा Blood Pressure होईल अनियंत्रित

Worst Foods For Blood Pressure : ब्लडप्रेशर कमी जास्त होण्याच्या समस्या देखील जानवतात. ब्लडप्रेशर नियंत्रीत ठेवण्यासाठी काही पदार्थ आहारातून पुर्णता वगळणे गरजेचं आहे. त्याबाबत आज जाणून घेऊ.
Worst Foods For Blood Pressure
Blood PressureSaam TV

आयुष्यात दु:ख नाही अशी एकही व्यक्ती नाही. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात काही ना काही कारणावरून अडचणी दु:ख येतं. दु:खातून बाहेर पडण्यासाठी व्यक्ती अनेक प्रयत्न करतात. यामुळे जास्त विचार करून काहींना हायपर टेंशनच्या समस्या निर्माण होतात. यामुळे काही काळाने ब्लडप्रेशर कमी जास्त होण्याच्या समस्या देखील जानवतात. ब्लडप्रेशर नियंत्रीत ठेवण्यासाठी काही पदार्थ आहारातून पुर्णता वगळणे गरजेचं आहे. त्याबाबत आज जाणून घेऊ.

Worst Foods For Blood Pressure
High Blood Pressure : उच्च रक्तदाबाची समस्या दूर करायची आहे? आहारात करा कांद्याचा सामावेश, जाणून घ्या फायदे

चिप्स आणि पॉपकॉर्न

हाय ब्लडप्रेशर असलेल्या व्यक्तींनी जेवणात जास्त मीठ खाऊ नये. तसेच पदार्थ किंवा फळांवर वरून कच्च मीठ टाकून खाऊ नये असं सांगतात. मीठ आणि सोडियम उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींच्या शरीरासाठी घातक असते. चिप्स तसेच पॉपकॉर्न हवाबंद पॅकेटमध्ये भरून ठेवले जातात.यामध्ये जास्त प्रमाणात मीठ असते. त्यामुळे असे पदार्थ खाणे पूर्णत: टाळावे.

मद्य

ज्या व्यक्तींना उच्च रक्तादाबाचा त्रास आहे त्यांनी दारू पिऊ नये. दारूचे सेवन केल्याने हा त्रास आणखी वाढतो. त्यामुळे उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्या औषधे सुरू असलेल्या व्यक्तींनी चुकूनही दारू पिऊ नये.

चहा किंवा कॉफी

ज्या व्यक्ती जास्त प्रमाणात चहा किंवा कॉफी पितात त्यांना भविष्यात उच्च रक्तदाबाच्या समस्या उद्भवू शकतात. तसेच चहा आणि कॉफी पिणाऱ्या व्यक्तींचा ब्लडप्रेशर आणखी वाढत जातो. चहा कॉफीमधील कॅफेन आपलं ब्लडप्रेशर आणखी वाढवते.

जास्त मीठ असलेलं लोणचं

लोणचं जेवणात अनेकांना आवडतं. त्याने जेवणाची भाजीची चव वाढते. आवडीची भाजी नसेल त्यावेळी देखील कही जण फक्त पोळी आणि भातासह लोणचं खातात. लोणचे खाणे आरोग्यासाठी चांगले आहे. मात्र त्यात मीठ जास्त असल्यास ब्लडप्रेशर आहे त्यापेक्षा जास्त वाढते.

Worst Foods For Blood Pressure
Blood Pressure: गरोदरपणात उच्च रक्तदाबाचा बाळावर होऊ शकतो परिणाम; अशा प्रकारे घ्या काळजी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com