Blood Pressure: गरोदरपणात उच्च रक्तदाबाचा बाळावर होऊ शकतो परिणाम; अशा प्रकारे घ्या काळजी

Pregnant Women Blood Pressure Problem: सध्याच्या काळात चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी आणि जीवनशैलीमुळे रक्तदाबाच्या समस्या निर्माण होतात. रक्तदाबाचा त्रास शरीरासाठी हानिकारक असतो. विशेषतः गरोदर महिलांना रक्तदाबाचा त्रास जास्त होतो.
Pregnant Women Blood Pressure Problem
Pregnant Women Blood Pressure ProblemSaam Tv
Published On

सध्याच्या काळात चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी आणि जीवनशैलीमुळे रक्तदाबाच्या समस्या निर्माण होतात. रक्तदाबाचा त्रास शरीरासाठी हानिकारक असतो. विशेषतः गरोदर महिलांना रक्तदाबाचा त्रास जास्त होतो. गरोदर महिलांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास होणे चांगले नाही. फक्त आईसाठीच नाही तर होणाऱ्या बाळासाठीही उच्च रक्तदाबाचा त्रास हानिकारक असतो. त्यामुळे आईला आणि मुलांना आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे गर्भधारणेच्या वेळी उच्च रक्तदाब कसा नियंत्रित करावा, याबद्दल आम्ही तुम्हाला माहिती देणार आहे.

गरोदरपणात २० आठवड्यानंतर रक्तदाब वाढण्याच्या समस्येला Gestantional Hypertension म्हणतात. डिलिव्हरीनंतर रक्तदाबाची ही समस्या आपोआप ठिक होते. या काळात महिलांच्या हृदयावर खूप ताण येतो. त्यामुळे आईला त्रास होतो. उच्च रक्तदाबाच्या तीन प्रकारच्या समस्या असू शकतात.

रक्तदाबाची समस्या

गरोदरपणात रक्तदाब वाढल्याने आईच्या मेंदू, डोळे, हृदयस यकृत, किडनीवर परिणाम होतो. यामुळे हृदयविकाराचा धोका निर्माण होतो. रक्तदाब वाढल्याने आईच्या पोटातील बाळाला कमी रक्तपुरवठा होतो. यामुळे बाळाची वाढ खुंटणे, कमी वजन, ९ महिन्यांआधीच प्रसूती अशा समस्या होऊ शकतो.

Pregnant Women Blood Pressure Problem
Barefoot Walking: तुम्हाला माहितीये का? अनवाणी पायाने चालल्याने मेंदूला मिळते चालना

अशी घ्या काळजी

  • गरोदरपणात रक्तदाब नियमितपणे चेक करा. रक्तदाब वाढला असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. तसेच तुम्हाला तुमच्या बाळाची वाढ कशी होत आहे, याची माहिती मिळेल.

  • गरोदरपणात वजन वाढणे हे सामान्य आहे. परंतु वजनावर नियंत्रण ठेवायला हवे. जास्त वजनामुळे आरोग्याच्या अनेक समस्या होऊ शकतात. त्यामुळे उच्च रक्तदाबाची समस्य अधिक गंभीर होऊ शकते.

  • आहारात बाहेरील अन्नपदार्थ, तेलकट, मसालेदार पदार्थ खाऊ नये. तसेच जेवणात जास्त मीठ घालू नये. जास्त मीठाच्या सेवनाने रक्तदाबाची समस्या वाढू शकते.

  • आहारात पालेभाज्या, फळे, दूध, लस्सी या पदार्थांचा समावेश करा. ज्यामुळे बाळाला पोषक तत्वे मिळतील.

  • शारिरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहण्याचा प्रयत्न करा. तुम्ही नियमितपणे व्यायाम आणि योग करु शकता.

  • गरोदरपणात मानसिक आरोग्याची चांगली काळजी घ्यायला हवी. यासाठी तुम्ही रोज ध्यान, योग करा.

  • गरोदर महिलांनी रोज ७-८ तास झोप घेतलीच पाहिजे. अपुरी झोप घेतल्यानेदेखील रक्तदाबाची समस्या होऊ शकते.

टीप- ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Pregnant Women Blood Pressure Problem
Relationship Tips: लव्ह मॅरेजसाठी पालकांची परवानगी मिळवायची आहे? 'या' टीप्स नक्की फॉलो करा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com