Dizziness Problem: चालताना अचानक चक्कर येतेय? शरीरात दिसणाऱ्या 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!

Dizziness Problem: चालताना अचानक चक्कर येणे, शरीराचा तोल जाणे यामागे कानातील समस्या असू शकतात. व्हर्टिगो, बीपीपीव्हीची लक्षणे, कारणे आणि आवश्यक तपासण्यांविषयी जाणून घ्या महत्त्वाच्या सात गोष्टी.
Dizziness Problem
Dizziness ProblemSaam Tv
Published On: 

Dizziness Problem: अनेकांना चालताना अचानक चक्कर येते, शरीराचा तोल जातो किंवा आजूबाजूच्या वस्तू फिरत असल्यासारखे वाटते. अनेकजण याकडे अशक्तपणा किंवा थकवा समजून दुर्लक्ष करतात. चक्कर येण्याचे कारण फक्त मेंदूशी संबंधित असते, असे नाही. कानांमध्ये काही समस्या असल्यासही वारंवार चक्कर येऊ शकते. कारण कानांचे काम फक्त ऐकणे नसून शरीराचा तोल सांभाळणे हे देखील आहे. त्यामुळे सतत चक्कर येत असल्यास कानांची तपासणी करून घेणे गरजेचे आहे.

कानांचा शरीराचा तोल राखण्यासाठी कसा उपयोग होतो?

आपल्या कानाच्या आतील भागात शरीराचा तोल सांभाळणारी एक खास यंत्रणा असते. त्याला बॅलन्स ॲपरेटस असे म्हणतात. या यंत्रणेमुळे आपल्याला चालताना, उठताना किंवा बसताना शरीराचा समतोल राखता येतो. या यंत्रणेत काही बिघाड झाल्यास चक्कर येऊ शकते. कानाच्या आतील भागात काही समस्या निर्माण झाल्यास शरीराचा तोल जातो. अशावेळी आजूबाजूच्या वस्तू फिरत असल्यासारखे वाटते. या समस्येला वैद्यकीय भाषेत व्हर्टिगो म्हणतात.

Dizziness Problem
Actor Death: प्रसिद्ध अभिनेता काळाच्या पडद्याआड, कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी; कुटुंबाने महिनाभर लपवली निधनाची बातमी

चक्कर येण्यामागे दुसरी कारणेही असू शकतात

प्रत्येक वेळी चक्कर येण्याचे कारण कानच असते असे नाही. काही वेळा नसांशी संबंधित समस्या किंवा मेंदूतील त्रासामुळेही चालताना तोल जाऊ शकतो. त्यामुळे वारंवार चक्कर येत असल्यास डॉक्टरांकडून तपासणी करून घेणे महत्त्वाचे आहे.

Dizziness Problem
Ramayana Box Office: बॉक्स ऑफिसवर 'रामायण'चा महाधमाका; १,२२८ कोटींची बंपर कमाई, 'या' सुपरहिट चित्रपटांना टाकले मागे!

वयाच्या ५० वर्षांनंतर वाढू शकते चक्कर येण्याची समस्या

वय वाढल्यानंतर कानाच्या आतील भागातील कॅल्शियमचे छोटे कण त्यांच्या जागेवरून हलू शकतात. या कणांमुळे शरीराचा तोल सांभाळण्यास मदत होते. मात्र, हे कण हलल्यास शरीराच्या समतोलावर परिणाम होतो आणि अचानक चक्कर येऊ शकते. या समस्येला बेनाईन पॅरोक्सिस्मल पोझिशनल व्हर्टिगो (BPPV) म्हणतात. विशेषतः डोके फिरवताना, झोपेतून उठताना किंवा खाली वाकताना यामुळे चक्कर येऊ शकते.

MRI आणि ENT तपासणी का करावी?

वारंवार चक्कर येत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका. चक्कर येण्याचे कारण कानांमध्ये आहे की मेंदूमध्ये, हे समजण्यासाठी डॉक्टर काही तपासण्या करण्यास सांगू शकतात. यामध्ये गरजेनुसार एमआरआय आणि कानांची तपासणी केली जाते. एमआरआयमुळे मेंदूशी संबंधित समस्या समजण्यास मदत होते, तर ईएनटी डॉक्टर कानांच्या आतील भागाची तपासणी करतात. त्यामुळे वारंवार चक्कर येत असेल किंवा चालताना शरीराचा तोल जात असेल तर स्वतःहून औषधे घेऊ नका. डॉक्टरांचा सल्ला घ्या.