TTE vs TC : रेल्वेत असणाऱ्या TTE आणि TC मध्ये फरक काय? तिकीट कोण तपासते? जाणून घ्या

TTE vs TC In Train : रेल्वेत TC आणि TTE दोन्ही आपल्याला पाहायला मिळतात. परंतु, यांच्यात नेमका फरक काय?
TTE vs TC
TTE vs TCSaam Tv
Published On

Difference Between TC And TTE In Railway :

रेल्वेने प्रवास करणारे आपल्यापैकी अनेक आहेत. रेल्वेने प्रवास करताना आपल्याला अधिक त्रास सहन करावा लागतो. अनेकांच्या खिशाला परवडणारी सहज व सोपी वाहतुक रेल्वे.

अनेकदा प्रवास करताना आपण तिकीट काढतो. परंतु, रेल्वेत TC आणि TTE दोन्ही आपल्याला पाहायला मिळतात. परंतु, यांच्यात नेमका फरक काय? तिकीट नसल्यास आपल्याकडून यापैकी कोण पैसे घेऊ शकते. जाणून घेऊया सविस्तर .

TTE vs TC
Bhiwandi One Day Trip: ठाणे जिल्ह्यातील भिंवडीतही आहेत फिरण्याची ठिकाणे; वन डे ट्रिप होईल अविस्मरणीय

रेल्वेत (Railway) TTE ची नियुक्ती ही वाणिज्य विभागाकडून केली जाते. प्रवास करताना बरेचदा ट्रेनमध्ये आणि प्लॅटफॉर्मवर तिकीटांची (Ticket) तपासणी केली जाते. टीटीईचा फुल फॉर्म ट्रॅव्हलिंग तिकीट एक्झामिनर असा आहे. याचे मुख्य काम असते प्रवाशांकडून तिकीटांची तपासणी करणे. बरेचदा प्रवाशी त्यांच्याकडून ओळखपत्राची मागणी देखील करतात.

TTE vs TC
Shirdi Trip In Budget : बजेटमध्ये फिरा शिर्डी; वन डे ट्रिप कशी कराल? जाणून घ्या सविस्तर

TC हा TTE प्रमाणेच काम करतो तसेच टीसी हा प्लॅटफॉर्म तिकीट पडताळू शकतो. एक्सप्रेसने प्रवास (Travel) करताना प्रवाशाकडे तिकीट असूनही बसायला जागा मिळत नसेल तर टीटीईला त्याची सोय करावी लागते. तसेच जर तिकीटासंबंधित व्यवहारही टीटीई करतो.

1. TC आणि TTE मध्ये फरक काय?

1. TTE

रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांच्या तिकिटांची तपासणी आणि पडताळणी करण्याची जबाबदारी TTE ची असते. प्रीमियम ट्रेनमधील तिकिटे देखील तपासू शकतात आणि वैध तिकिटांशिवाय प्रवाशांना दंड आकारू शकतात.

TTE vs TC
South Bombay Famous Place : दक्षिण मुंबईतील झक्कास ठिकाणं...,खाणं-फिरणं सगळं एकाच दिवसात होईल!

2. TC

ट्रेनची तिकिटे तपासण्यासाठी टीसी असतो परंतु, केवळ प्लॅटफॉर्म प्रवेश/एक्झिट गेट्सवर. त्यांना ट्रेनमध्ये तिकिटांची पडताळणी करण्याचा अधिकार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com