Cough Syrup : लहान मुलांना सर्दी-खोकल्यासाठी कफ सिरप देऊ नका, DCGI चा फार्मास्युटिकल कंपन्यांना दिला इशारा

Cold Flu Cough Syrups : DCGI ने १८ डिसेंबर रोजी सर्व राज्यांना पत्र लिहून क्लोरेफेनिरामाइन मॅलेट आणि फेनिलेफ्राइन या दोन औषधांच्या कॉकटेलचा वापर करुन तयार केलेल्या सिरपच्या पॅकेजिंगवर लेबल लावण्यास सांगितले आहे.
Cough Syrup
Cough SyrupSaam Tv
Published On

DCGI Bans Cough Syrup :

भारताच्या औषध नियामक DCGI ने चार वर्षांखालील मुलांसाठी सर्दी आणि खोकला सिरप देण्यास बंदी घालण्याचा इशारा दिला आहे. DCGI ने १८ डिसेंबर रोजी सर्व राज्यांना पत्र लिहून क्लोरेफेनिरामाइन मॅलेट आणि फेनिलेफ्राइन या दोन औषधांच्या कॉकटेलचा वापर करुन तयार केलेल्या सिरपच्या पॅकेजिंगवर लेबल लावण्यास सांगितले आहे.

या दोन औषधांना (Medicine) एकत्र तयार करुन सिरप किंवा गोळ्या सर्दीच्या लक्षणांवर उपचार करण्यासाठी वापरल्या जातात. सिरपच्या वापरामुळे जगभरात १४१ मुलांचा मृत्यू झाल्यामुळे ही बंदी घालण्यात आली आहे.

1. समितीच्या आधारावर निर्णय

राज्यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, क्लोरफेनिरामाइन मॅलेट आयपी 2mg+ फेनिलेफ्रिन HCI IP 5mg ड्रॉप/ml चे डोस ठरवण्यात आले आहे. तसेच समितीच्या शिफारशीनुसार FDC च्या धोरणात्मक निर्णयानुसार १७ जुलै २०१५ रोजी FDC विषयाचे उत्पादन सुरु ठेवण्यासाठी NOC प्रमाणपत्र जारी केले आहे.

Cough Syrup
Winter Care Tips : हिवाळ्यात गुडघे आणि सांधे दुखीचा त्रास वाढलाय? असू शकते कॅल्शियमची कमतरता, वेळीच घ्या काळजी

2. कंपन्यांना दिला इशारा

समितीने सांगितले आहे की, FDCs ४ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना देऊ नका. त्यासाठी कंपन्यांनी लेबल आणि पॅकेज लावण्याचा इशारा दिला आहे.

3. बालरोगतज्ज्ञ काय म्हणाले?

दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयाचे ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ डॉ. धीरेन गुप्त यांच्याशी चर्चा केली. ते म्हणाले की, Chlorpheniramine maleate + phenylephrine hydrochlorid हे औषध १ वर्षापेक्षा कमी असणाऱ्या मुलांसाठी (Kids) तयार केले जात नाही. २ ते ४ वर्ष वयोगटातील मुलांसाठी सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच हे औषध मुलांना कमी प्रमाणात द्यावे. औषधांचे प्रमाण जास्त झाल्यास मुलांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com