Dark Neck Home Remedies : मानेवरील काळपटपणामुळे वैतागले आहात ? तर फक्त 'हे' करुन पाहा, 100 टक्के रिजल्ट मिळेल

Skin Care Tips : त्वचा आणि हार्मोनमुळे मानेचा भाग हा जास्त काळपट होत जातो.
Dark Neck Home Remedies
Dark Neck Home RemediesSaam Tv
Published On

Dark Neck Home Remedies : मानेचा रंग काळा होणे. हे खूप लोकांनी अनुभवले असेल. यामुळे त्याच्यामध्ये न्यूनगंड निर्माण होतो. ते मनमोकळेपणाने सार्वजनिक ठिकाणी जाऊ शकत नाही. काही जण तर त्याची हेअर स्टाईल आणि ड्रेसिंग स्टाइल देखील बदलतात. हे खूप लोकांना लजास्पत वाटते.

शरीरातील सांधे हे काळपटच असतात. त्वचा आणि हार्मोनमुळे शरीराचा इतर भागापेक्षा हे भाग जास्त काळपट असतात. यामुळे तुम्ही त्रासले असाल तर आम्ही काही घरगुती उपाय (Home Remedies) शोधले आहे. यामुळे तुमची त्वचा (Skin) पुन्हा नव्यासारखी चमकेल

Dark Neck Home Remedies
Waxing At Home : घरच्या घरी वॅक्सिंग करताना करू नका 'या' 5 चुका; अन्यथा पश्चातापाची वेळ येईल!

1. मध आणि लिंबू

मानेवरील काळपटपणा दूर करण्यासाठी लिंबू आणि मधाचा वापर गुणकारी आहे. त्यामुळे मधात थोडासा लिंबाचा रस मिळवावा आणि मानेवरील काळपट जागी लावून ती जागा स्वच्छ पाण्याने धुवावे.

2. हळद आणि बेसन

हळद हे त्वचेसाठी उत्तम आहे. हे सगळ्यांना माहीत आहे. हळदी ही केसासाठी उत्तम आहे. बेसन चे महत्व हे हळदी इतकेच आहे. हळद आणि बेसन चे मिश्रण उजलत्या त्वचा वापरले जाते. काही चमचा बेसन मध्ये थोडी हळद टाकून त्या मध्ये तुमचा आवडीनुसार पाणी किंवा दही मध्ये टाकून लेप तयार करू शकतात. हा लेप तुम्ही मानेवर लावा.

Dark Neck Home Remedies
Home Cleaning Hacks : घर साफ करण्याचा वैताग येतो? या 5 टिप्स फॉलो करा

3. दही आणि पपई

कच्ची पपईचा वापर करून काही दिवसात मानेवरील काळपटपणा दूर होऊ शकतो.सर्वप्रथम कच्ची पपई चा पेस्ट करा. आता ती पेस्ट गुलाब जल आणि दहीमध्ये मिसळून हा लेप मानेला लावा. काही वेळ तसेच राहू द्यावा. लेप सुखल्यानेनंतर स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या.

4. बटाटा

बटाटामध्ये स्किन ग्लो करायचे सर्व गुण आहे.या शिवाय हे स्वस्त आणि सहज उपलब्ध होते. तुम्हाला फक्त एक लहान बटाटा घ्यावा त्याच्या रस काढावा.तो रस काळपट त्वचा वर लावा आणि तो तसाच काही वेळ राहू द्यावावा. थोडा वेळात स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या.

Dark Neck Home Remedies
Lizard Home Remedies : भिंतीवरील पालींपासून सुटका मिळवायची आहे ? 'हे' घरगुती उपाय करुन पाहा !

5. दही

एन्झाईम्समुळे काळी त्वचा खुलून दिसते. हे एन्जाइमचे दह्यामध्ये असतात.यामुळे त्वचा उजळते. यासाठी तुम्हाला फक्त दही आणि लिंबू पाहिजे. लिंबूमध्ये एसिड असते. . त्यामुळे आवश्यतेनुसार दही आणि लिंबाचा रस मिक्स करून पेस्ट तयार करा. हे मिश्रण त्वचेला पोषण तर देते त्या सोबत त्वचा मऊ करतो. तयार केलेल्या पेस्ट २० मिनिटे काळपट भागावर लावून त्यांनतर स्वच्छ पाण्याने (Water) धुऊन घ्या.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com