Daily योग: पाठदुखीच्या समस्यांवर रामबाण उपाय; नियमित करा नीरलंबासन

नीरलंबासनाचे फायदे
Daily योग: पाठदुखीच्या समस्यांवर रामबाण उपाय; नियमित करा नीरलंबासन
Daily योग: पाठदुखीच्या समस्यांवर रामबाण उपाय; नियमित करा नीरलंबासनSaamTv

दीर्घायुषी व्हायचं असेल तर योग करा, असा सल्ला कायमच देण्यात येतो. भारतात अनादी काळापासून योग केला जातो. त्यामुळे आपल्या घरातील ज्येष्ठ मंडळी आजही आपल्याला प्राणायाम किंवा हलके योग प्रकार करताना दिसून येतात. विशेष म्हणजे कित्येक काळापासून योग केल्यामुळे आजदेखील ही ज्येष्ठ मंडळी फिट असल्याचं पाहायला मिळतं. Daily Yoga: Panacea for back pain; Do regular Niralambasana

उलटपक्षी सध्याच्या अनेक तरुणांमध्ये वयाच्या २५ व्या वर्षापासूनच कंबरदुखी, पाठदुखी अशा समस्या निर्माण होत असल्याचं दिसून येतं. त्यामुळेच वर्कआऊट करण्यासोबतच तरुणांनी योग करणं गरजेचं आहे. त्यातच पाठदुखीसारख्या समस्यांवर नीरलंबासन कसं फायदेशीर ठरतं ते जाणून घेऊयात..

Daily योग: पाठदुखीच्या समस्यांवर रामबाण उपाय; नियमित करा नीरलंबासन
Daily योग: पाठदुखीने त्रस्त आहात? अर्ध कटिचक्रासन नक्की करून पहा

नीरलंबासन करण्याचे फायदे -

१. पाठदुखीची समस्या दूर होते.

२. पाठीचा कणा व ओटीपोट यांना होणारा रक्तपुरवठा सुरळीत होतो.

३. नीरलंबासन केल्यामुळे पाठीच्या कणाशी निगडीत समस्या दूर होतात.

४. पाठीच्या कणाचे स्नायू लवचिक होतात.

५. हात, खांदे, मान व पोट यांचे स्नायू बळकट होतात.

६. फुफ्फुसांची काम करण्याची क्षमता वाढते.

७. मानसिक संतुलन आणि एकाग्रता वाढण्यास मदत होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com