Walking Benefits : मृत्यूचा धोका होईल कमी! रोज इतकी पावलं चाला, आरोग्याला होतील अनेक फायदे

Daily walk Steps : बरेच लोक स्वत:ला निरोगी आणि सक्रीय ठेवण्यासाठी वारंवार चालतात.
Walking Benefits
Walking Benefits Saam Tv
Published On

Daily Walk Benefits : अनेकांना मॉर्निंग वॉकला जाण्याची सवय असते. आरोग्य निरोगी व सुदृढ राहाण्यासाठी जितका सकस आहार महत्त्वाचा तितकेच त्याची काळजी घेणे देखील महत्त्वाचे. नियमितपणे शरीरही क्रियाशील असणे देखील महत्त्वाचे आहे.

बरेच लोक स्वत:ला निरोगी आणि सक्रीय ठेवण्यासाठी वारंवार चालतात. चालणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. याबाबत अलीकडेच एक संशोधन करण्यात आले त्यातून असे समजले की, चालण्याने तुमच्या आरोग्याला अधिक फायदा होऊ शकतो.

Walking Benefits
Best Way To Morning Walk : मॉर्निंग वॉक करण्यापूर्वी नाश्ता करावा की नाही? वॉकची योग्य पद्धत कोणती, जाणून घ्या

दिवसाला सुमारे ४००० पावले चालल्याने मृत्यूचा धोका कमी होतो. याशिवाय अभ्यासात असे दिसून आले की, जर तुम्ही दररोज 2,337 पावले चालत असाल तर हृदयविकारामुळे मृत्यूचा धोका कमी होऊ शकतो. जाणून घेऊया चालणे शरीरासाठी किती फायदेशीर आहे.

1. चालणे किती फायदेशीर (Benefits) आहे?

जगभरातील सुमारे 2,26,889 लोकांवर केलेल्या 17 वेगवेगळ्या अभ्यासांमध्ये असे आढळून आले की, तुम्ही जितके जास्त चालाल, तितका तुमच्या आरोग्याला फायदा होईल. युरोपियन जर्नल ऑफ प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात असे म्हटले आहे की, 500 ते 1,000 पावले चालणे कोणत्याही कारणामुळे किंवा हृदयाशी (Heart) संबंधित आजारांमुळे (Disease) मृत्यूचा धोका 15 टक्क्यांनी कमी करू शकतो.

Walking Benefits
Black Coffee Side Effects : या रुग्णांनी चुकूनही पिऊ नका ब्लॅक कॉफी; अन्यथा, आरोग्याच्या अनेक समस्या जडतील

2. अभ्यास काय सांगतो?

यासोबतच या अभ्यासात असेही सांगण्यात आले आहे की, दररोज 500 पावले चालल्याने हृदयविकारामुळे होणारे मृत्यू 7 टक्क्यांनी कमी होऊ शकतात. अभ्यासात सहभागी असलेल्या तज्ज्ञांच्या मते, दररोज किमान 4,000 पावले चालणे कोणत्याही कारणामुळे होणारे मृत्यू कमी करू शकतात. यासोबतच त्यांनी हे देखील सांगितले की हे स्त्री आणि पुरुष दोघांवरही समानतेने काम करते .

3. चालण्याचे फायदे

  • चालण्याने मृत्यूचा धोका कमी होऊ शकतो, असे नुकत्याच झालेल्या अभ्यासातून समोर आले आहे. रोज चालण्याने आरोग्यासाठी इतरही अनेक फायदे होतात. चला जाणून घेऊया चालण्याचे आणखी काही फायदे

Walking Benefits
Wrong Sitting Posture: ऑफिसमध्ये एकाच जागी बसून काम करण्याची सवय आहे? शरीराच्या या भागांवर होऊ शकतो परिणाम
  • जर तुम्ही दररोज सकाळी चालत असाल तर ते तुमच्या शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करते, ज्यामुळे तुमचे हृदय निरोगी होते.

  • दररोज सुमारे ३० मिनिटे चालल्याने उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवता येतो. अशा परिस्थितीत बीपीच्या रुग्णांसाठी दररोज चालणे फायदेशीर ठरू शकते.

  • तुम्हाला वजन कमी करायचे असले तरी चालणे तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरेल. रोज चालण्याने कॅलरीज बर्न होतात.

  • मधुमेहाचा त्रास असलेल्या लोकांसाठी चालणे खूप फायदेशीर आहे. दररोज सुमारे 30 मिनिटे चालल्याने या समस्येपासून आराम मिळेल.

Walking Benefits
Famous Travel Places In Vasai : मुंबईजवळच्या निसर्गात हरवून जायचंय; वसईतील पर्यटनस्थळे घालतील भुरळ!
  • जर तुम्हाला सांधेदुखीचा त्रास होत असेल तर तुम्ही दररोज 30 मिनिटे चालले पाहिजे. असे केल्याने स्नायू मजबूत होतील आणि सांधेदुखीपासून आराम मिळेल.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com