Covid-19 JN.1 Precautions: कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटपासून मुलांचे रक्षण कसे कराल? या पद्धती अवलंबा

Covid-19 JN.1 Precautions For Kids: कोरोना महामारी पुन्हा एकदा लोकांसाठी त्रासाचे कारण बनली आहे. या भयंकर साथीच्या प्रकरणांमध्ये काही काळापासून घट झाली असली, तरी अलीकडेच त्याच्या नवीन सब- व्हेरिएंट लोकांच्या चिंतेत पुन्हा एकदा वाढ केली आहे.
Covid-19 JN.1 Precautions Tips in Marathi
Covid-19 JN.1 Precautions Tips in MarathiSaam Tv
Published On

Precautions To Avoid New Covid-19 Variant:

कोरोना महामारी पुन्हा एकदा लोकांसाठी त्रासाचे कारण बनली आहे. या भयंकर साथीच्या प्रकरणांमध्ये काही काळापासून घट झाली असली, तरी अलीकडेच त्याच्या नवीन सब- व्हेरिएंट लोकांच्या चिंतेत पुन्हा एकदा वाढ केली आहे. वास्तविक, गेल्या काही काळापासून जगातील अनेक देशांमध्ये कोरोना JN.1 चे रुग्ण (Patients) आढळून येत आहेत. भारतातील अनेक राज्यांतून रुग्नांची नोंदणी केली आहेत. अशा स्थितीत आता आरोग्य तज्ज्ञांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे.

वर्ष सरत असतानाच कोरोनाने पुन्हा एकदा दार ठोठावले आहे. नुकत्याच समोर आलेल्या कोरोनाचे नवीन सब- व्हेरिएंट JN.1 मुळे जगभरात पुन्हा कोरोनाच्या रुग्णांमध्ये अचानक वाढ झाली आहे. अशा स्थितीत नवीन वर्षात स्वत:ला सुरक्षित ठेवणे खूप गरजेचे आहे. जर तुम्हाला तुमच्या मुलांचे या नवीन व्हेरिएंटपासून संरक्षण करायचे असेल तर या गोष्टी लक्षात ठेवा.

Covid-19 JN.1 Precautions Tips in Marathi
Relationship Tips : नुकतेच रिलेशनमध्ये आलाय? या चुका करुच नका, अन्यथा...

सोशल डिस्टन्सिंग

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग हा सर्वात प्रभावी मार्ग आहे. अशा स्थितीत, आपल्या मुलांना सुरक्षित ठेवण्यासाठी, सामाजिक अंतर राखण्यासाठी प्रोत्साहित करा, विशेषत: शाळा किंवा सार्वजनिक ठिकाणी, जिथे विषाणूचा प्रसार होण्याची शक्यता जास्त आहे तेथे त्यांना कसे राहावे ते शिकवा.

Covid-19 JN.1 Precautions Tips in Marathi
Covid-19 JN.1: ‘जेएन-१’ घातक नाही; नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी: आरोग्यमंत्री

मास्क वापरा

कोणत्याही प्रकारचे व्हायरस (Virus) टाळण्यासाठी मास्क घालणे फार महत्वाचे आहे. अशा स्थितीत तुमच्या मुलांना कोरोनापासून वाचवण्यासाठी त्यांना मास्क घालण्याची सवय लावा. विशेषतः गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याची खात्री करा. पालकांनी विशेष काळजी घेतली पाहिजे की, मुलांनी त्यांच्या नाक आणि तोंडावर चांगले मास्क घालावेत.

वारंवार हात धुणे

तुमच्या मुलांना वैयक्तिक स्वच्छतेचे महत्त्व समजावून सांगा आणि त्यांना किमान 20 सेकंद साबणाने आणि पाण्याने वारंवार हात धुण्यास प्रोत्साहित करा. तसेच मुलांना त्यांच्या डोळ्यांना, नाकाला आणि तोंडाला पुन्हा पुन्हा हात लावू नका असे सांगा.

Covid-19 JN.1 Precautions Tips in Marathi
Maharashtra Corona Update: महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातही कोरोना नव्या व्हेरियंटचा शिरकाव, अकोला JN.1 बाधित पहिला रूग्ण

योग्य व्हेंटिलेशन मॅनेजमेंट करा

घरात किंवा जिथे मुलं खूप राहतात त्या ठिकाणी योग्य वायुवीजनाची व्यवस्था करा. योग्य व्हेंटिलेशन व्हायरसचा धोका कमी करते. शक्य असल्यास, घरातील व्हेंटिलेशन सुधारण्यासाठी खिडक्या किंवा दरवाजे उघडे ठेवा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com