China New Virus: चीनमध्ये पसरतोय नवीन व्हायरस, WHOनेही दिला इशारा; काय आहेत लक्षणे, भारतासाठी किती धोकादायक?

China New Virus: कोरोना महामारीने संपूर्ण जगाला हादरवून सोडल होतं. आता पुन्हा नव्या भयंकर आजाराने डोकं वर काढलं असून या आजाराची सुरुवात देखील चीनमधूनच झाली आहे.
China New Virus
China New VirusSaam Digital
Published On

China New Virus

कोरोना महामारीने संपूर्ण जगाला हादरवून सोडल होतं. आता पुन्हा नव्या भयंकर आजाराने डोकं वर काढलं असून या आजाराची सुरुवात देखील चीनमधूनच झाली आहे. चीनच्या उत्तर पूर्व प्रांतातील लियाओनिंग भागातील मुलांमध्ये निमोनिया सारखी लक्षणं आढळून आली आहेत. फुफ्फुसाला सूज, श्वास घेण्यात अडचणी आणि खोकल्यासह तापाची लक्षणं दिसून आली आहेत. त्यामुळे पुन्हा खळबळ माजण्याची शक्यता असून डब्ल्यूएचओनेही सतर्कतेचा इशारा दिला आहे. भारत सरकारनेही नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.

चिनने या आजाराबाबत १३ नोव्हेंबर रोजी स्थानिक माध्यमांना माहिती दिली होती. आरोग्य संस्थांनी या आजाराशी संबंधित रुग्णांना देखरेखीखाली ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत. तर या आजाराबाबतची सर्व माहिती चीनने द्यावी, असं डब्ल्यूएचओने म्हटलं आहे.

भारतावर काय होईल परिणाम?

चिनमधील हा व्हायरस भारतात पसरण्याची शक्यता कमी आहे. तरीही या परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्यांच आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे. चिनमध्ये पसरणाऱ्या एवियन एन्फ्लूएन्झा व्हायरससह श्वसनासंबंधित आजाराचा भारताला धोका नाही. तसेच अशा प्रकारच्या कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज असल्यांच मंत्रालयाने म्हटलं आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

काय आहेत डब्ल्यूएचओच्या मार्गदर्शक सूचना?

चिनमध्ये पसरणाऱ्या या भयंकर आजाराविषयी डब्ल्यूएचओने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. डब्ल्यूएचओने लोकांना सावधानेतेचा इशारा दिला आहे. तसेच स्वच्छता राखण्यासह कोणतेही लक्षण आढळल्यास त्वरित डॉक्टरांना दाखवावे. योग्य अंतर ठेवणे आणि मास्क वापरण्याच्या सूचना केल्या आहेत.

आजाराची लक्षणं

छातीत दुखणे

खोकला

अशक्तपणा, ताप

फुफ्फुसाला सूज येणे

श्वास घेण्यात अडचण

China New Virus
Uttarakhand Tunnel Accident Update: उत्तरकाशी बचावकार्यात पुन्हा अडचणी, १४ दिवसांपासून सुरू आहे मोहीम

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com