Constipation Problem : वारंवार बद्धकोष्ठतेचा त्रास होतोय? ही पाने चावून खा, मिळेल आराम

Constipation Causes : बदलेल्या जीवनशैलीमुळे आपल्याला आहारात सगळ्यात जास्त जंक फूडचे सेवन केले जाते. सततचे तेलकट आणि बाहेरचे पदार्थ खाल्ल्याने आपल्याला बद्धकोष्ठतेचा त्रास सहन करावा लागतो.
Constipation Problem, Constipation Causes
Constipation Problem, Constipation CausesSaam tv
Published On

Constipation Home Remedies :

बदलेल्या जीवनशैलीमुळे (Lifestyle) आपल्याला आहारात सगळ्यात जास्त जंक फूडचे सेवन केले जाते. सततचे तेलकट आणि बाहेरचे पदार्थ खाल्ल्याने आपल्याला बद्धकोष्ठतेचा त्रास सहन करावा लागतो.

बद्धकोष्ठतेचा त्रास हा हार्मोनल बदल आणि पचनक्रियेच्या समस्येमुळे उद्भवतो. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, अवेळी जेवणे यामुळे अपचन, गॅस आणि बद्धकोष्ठतेचा त्रास सहन करावा लागतो. पोट व्यवस्थित साफ न झाल्यास आपल्याला अस्वस्थ वाटू लागते. अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घ्या. परंतु, हा त्रास वारंवार होत असेल तर आयुर्वेदात सांगितलेल्या या गोष्टी लक्षात ठेवा. आयुर्वेदानुसार ही पाने चावून खाल्ल्याने बद्धकोष्ठतेच्या त्रासापासून आराम मिळेल.

1. पुदीन्याची पाने

आहारात पुदिन्याच्या पानांचा समावेश करण्याचे अनेक फायदे आहेत. यामुळे पोट थंड राहाते. बद्धकोष्ठतेच्या समस्येवर फायदेशीर (Benefits) आहे. गॅस, अॅसिडिटी आणि बद्धकोष्ठतेवर पुदिन्याची पाने थेट चावून खाऊ शकता. या पानांपासून हर्बल चहा बनवून पिऊ शकता. तसेच जेवणात याचा समावेश करा.

Constipation Problem, Constipation Causes
Migraine Problem : सततची डोकेदुखी वाढलीये? असू शकतो मायग्रेनचा त्रास, वेळीच ओळखा लक्षणे

2. कढीपत्ता

जेवणाची चव वाढवण्यासाठी कढीपत्त्याचा वापर केला जातो. परंतु, कढीपत्त्यामध्ये असणारे घटक पचनक्रिया व्यवस्थित ठेवण्यास मदत करते. बद्धकोष्ठतेच्या समस्येने त्रस्त असाल तर रिकाम्या पोटी कढीपत्ता चावून खा.

3. सेलेरीची पाने

जेवल्यानंतर पोट फुगण्याची किंवा गॅसेसची समस्या असेल तर सेलेरीची पाने खाल्ल्याने आराम मिळतो. जर बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर रिकाम्या पोटी सेलेरीची पाने चावून खा.

Constipation Problem, Constipation Causes
Menopause Risk Stroke : धक्कादायक! १० पैकी ४ महिलांना रजोनिवृत्तीमुळे स्ट्रोकचा धोका, संशोधनातून खुलासा

4. सुपारीची पाने

बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी सुपारीची पाने चघळणे देखील खूप फायदेशीर ठरते. सकाळी रिकाम्या पोटी (Stomach) याची पाने चावून खाल्ल्याने ३ ते ४ दिवसात प्रभाव दिसून येईल.

5. जांभळाची पाने

जांभळाची पाने खाल्ल्याने पचनक्रिया सुरळीत होते. त्यामुळे पोट व्यवस्थित साफ होते. ज्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही. गॅस, अॅसिडीटी, बद्धकोष्ठता अशा अनेक समस्यांवर जांभळाची पाने बहुगुणी ठरतात.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com