Parenting Tips: पालकांच्या या चुकांमुळे थांबू शकते मुलांची वाढ, तुम्ही देखील असे करत नाही ना?

Common Parenting Mistakes to Avoid : वाढत्या वयानुसार काही मुलांचा विकास हा संथ गतीने होत असतो तर काहींचा विकास हा जलद गतीने.
Parenting Tips
Parenting TipsSaam tv
Published On

Child Care Tips : मुलांची शारीरिक व मानसिक स्थिती उत्तम राहाण्यासाठी पालक त्यांच्या विकासाची अधिक काळजी घेतात. मुलांचा योग्य विकास व्हावा असे प्रत्येक पालकांना वाटत असते. वाढत्या वयानुसार काही मुलांचा विकास हा संथ गतीने होत असतो तर काहींचा विकास हा जलद गतीने.

हल्लीचे पालक ऑफिस व कामानिमित्त घराबाहेर असतात. त्यामुळे त्यांना मुलांकडे विशेष लक्ष देता येत नाही. अशातच मुलांचा विकास योग्य वयात होत नसेल तर पालकांना चिंता वाटू लागते. म्हणून पालकांनी मुलांच्या शारीरिक विकासाकडे लक्ष देणे आवश्यक आहे. मुलाचा शारीरिक विकास थांबण्याची अनेक कारणे आहेत, त्यांना ओळखणे अत्यंत आवश्यक आहे.

Parenting Tips
Parenting Tips: पालकांनो, मुल सतत मोबाईल पाहतात, हट्टी झालीये? कसा सोडवाल स्क्रीनचा नाद

1. पुरेशी झोप न मिळणे

मुलाच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी पुरेशी झोप घेणे खूप महत्वाचे आहे. जेव्हा बाळ गाढ झोपेत असते तेव्हा त्याचा मेंदू विकसित होतो. तसेच, शरीर पेशी दुरुस्त करते आणि शरीराचा विकासही होतो.

2. बाहेर खेळायला जा

आजकाल मुल घरीच जास्त टीव्ही किंवा मोबाईल (Mobile) पाहातात. त्यामुळे त्याचा शारीरिक विकास होत नाही. मुलांना किमान एक तास बाहेर खेळू द्या, त्यांना खुल्या वातावरणात रमू द्या.

Parenting Tips
Smallest Hill Station Near Mumbai : मुंबईजवळचं नयनरम्य, पण सगळ्यात छोटं हिल स्टेशन, घरी यावंसंच वाटणार नाही!

3. संतुलित आहार न घेणे

बाळाला सुरुवातीपासूनच संतुलित आहार द्या. ज्यामध्ये हिरव्या भाज्या, कडधान्ये, बीन्स, फळे, संपूर्ण धान्य इ. मुलाच्या शारीरिक विकासासाठी संतुलित आहार अत्यंत आवश्यक आहे.

4. अनियमित शारीरिक क्रियाकलाप

मुलांच्या वयानुसार शारीरिक क्रियाकलाप देखील आवश्यक आहे. यामुळे मुलांच्या शरीरात लवचिकता येते. पुढे त्याला हृदयविकार (Heart Disease), लठ्ठपणा इत्यादींचा सामना करावा लागत नाही.

Parenting Tips
Best Place In Konkan : निसर्ग सौंदर्याने बहरला कोकण, पावसाळ्यात ही १० ठिकाणं प्रेमात पाडतीलच!

5. स्क्रीन टाइम

मुलाला जास्त स्क्रीन (Screen) टाइम दिल्याने त्याच्या विकासात अडथळा येतो. आजकाल बहुतेक लोक मुलांना घेऊन टीव्हीसमोर बसतात आणि त्यांचे काम सुरू करतात, जे खूप हानिकारक असू शकते. मुलांना बाहेर नेण्याऐवजी टीव्हीसमोर बसवल्याने मुलांची वाढ खुंटते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com