Childrens Day: बाल दिवस १४ नोव्हेंबरलाच का साजरा करतात? खूप कमी लोकांना माहिती आहेत या इंटरेस्टिंग गोष्टी...

Why Childrens Day Celebrated on 14th November: उद्या देशभरात बालदिन साजरा केला जाणार आहे. बालदिवस १४ नोव्हेंबरलाच का साजरा करतात यामागचे कारण तुम्हाला माहितीये का?
Childrens Day
Childrens DaySaam Tv
Published On

उद्या १४ नोव्हेंबर म्हणजे बाल दिवस. १४ नोव्हेंबर रोजी देशभरात बाल दिवस साजरा केला जातो. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीनिमित्त बालदिन साजरा केला जातो. पंडित जवाहरलाल नेहरु यांना लहान मुले खूप आवडायची. त्यामुळेच त्यांचा जन्मदिवस बालदिन म्हणून साजरा करतात. दरम्यान, १४ नोव्हेंबरलाच बाल दिवस का साजरा केला जातो? यामागचे कारण जाणून घ्या.

Childrens Day
PF Transfer Process : एका कंपनीतून दुसऱ्या कंपनीत जाताय पीएफचं टेन्शन संपलं! झटक्यात होणार पैसे ट्रान्सफर, जाणून घ्या सविस्तर

बाल दिवस कधी साजरा केला जातो?

दरवर्षी १४ नोव्हेंबर रोजी बाल दिवस साजरा केला जातो. पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या आठवणीत बालदिन साजरा करतात.

बालदिन कधीपासून साजरा करतात?

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या निधनानंतर १९६४ मध्ये १४ नोव्हेंबर हा दिवस बालदिन म्हणून घोषित केला.

पंडित जवाहरलाल नेहरुंना लहान मुले का आवडायची?

पंडित जवाहरलाल नेहरु हे लहान मुलांना देशाचे उज्जवल भविष्य मानायचे. ते लहान मुलांना शिक्षण घेण्यासाठी प्रेरित करायचे. त्यांच्या मते, मुले ही देवाघरची फुले असतात.

बाल दिवस साजरा करण्यामागचा उद्देश

बाल दिवस साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश लहान मुलांना त्यांचे अधिकार, शिक्षण आणि विकाससाठी जागरुक करण असा आहे. शिक्षणासाठी लहान मुलांना प्रोत्साहन देणे, असा आहे.

Childrens Day
EPFO News : EPFO ने केला मोठा बदल! पीएफ ट्रान्सफरसाठी HR ची गरज नाही, नोकरी बदलल्यावर २ दिवसात पैसे ट्रान्सफर होणार

पंडित जवाहरलाल नेहरु यांचा जन्म कधी झाला?

पंडित जवाहरलाल नेहरु यांचा जन्म १४ नोव्हेंबर १८८९ रोजी इलाहाबाद (आताचे प्रयागराज)उत्तर प्रदेश येथे झाला.

लहान मुले पंडित जवाहरलाल नेहरु यांना काय म्हणतात?

लहान मुले पंडित जवाहरलाल नेहरुंना चाचा नेहरु या नावाने ओळखतात.

Childrens Day
PM Narendra Modi : मुंबईला मिळालं आणखी एक आंतरराष्ट्रीय विमानतळ; दि. बा. पाटील यांचं स्मरण करत PM मोदी काय म्हणाले? VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com