Child Care Tips : मुलांमध्ये लोहाची कमतरता निर्माण होतेय ? 'या' फळाचा रस प्या,रक्ताची कमतरता देखील भरुन निघेल !

मुलांच्या शरीरात लोहाची कमतरता जाणवू लागल्यास रेल बल्ड सेल्स कमी होऊ लागतात.
Child Care Tips
Child Care TipsSaam Tv
Published On

Child Care Tips : मुल जसं जसे वाढू लागते तसं तसे त्याच्या शारीरिक व मानसिक विकासाची वाढ होऊ लागते. त्यासाठी त्यांना पुरेशा प्रमाणात प्रत्येक घटकांची आवश्यकता असते.

मुलांच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे त्यांच्या शरीरातील लोहाची कमतरता जाणवू लागते. त्यामुळे मुले आजारी पडतात किंवा त्यांना अशक्तपणा येऊ लागतो.

मुलांच्या (Child) शरीरात लोहाची कमतरता जाणवू लागल्यास रेल बल्ड सेल्स कमी होऊ लागतात. जर मुलांमध्ये रक्ताची कमतरता असेल तर त्यांच्या आहारात काही आवश्यक बदल केले जाऊ शकतात. आवळा हे देखील असेच एक फळ आहे ज्याचा रस मुलांना दिल्यास रक्ताची कमतरता भरून काढता येते. त्याचे फायदे (Benefits) आणि मुलांच्या आरोग्यावर होणारे परिणाम जाणून घ्या.

Child Care Tips
औषधी गुणांनी समृध्द अशी पपई !

लोहाच्या कमतरतेसाठी आवळा रस फायदेशीर

आवळा हा जीवनसत्त्व क आणि लोहासारख्या अनेक पोषक तत्वांनी समृद्ध आहे. विशेषत: अशक्तपणा येणाऱ्या व्यक्तीला आवळा खाण्याचा सल्ला दिला जातो. आवळा ज्यूस हा मुलांना दिवसातून एकदा मर्यादित प्रमाणात दिला जाऊ शकतो.

Amala Juice
Amala JuiceCanva

मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठीही आवळा उपयुक्त आहे. त्यात अनेक अँटीऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्व क आढळतात, जे शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. आवळ्याच्या रसाची चव वाढवण्यासाठी आपण त्यात काळे मीठ घालू शकतो.

Child Care Tips
फळे खाण्याची योग्य वेळ कोणती? झोपण्यापूर्वी की, जेवणाआधी?

हे रस देखील आहेत उपयुक्त

आवळा व्यतिरिक्त, अशी अनेक फळे आणि भाज्या आहेत ज्यांचा रस मुलांमध्ये लोहाची कमतरता पूर्ण करण्यासाठी दिला जाऊ शकतो.

१. पालक आणि अननस एकत्र करून बनवलेल्या रसाने शरीरातील लोहाची कमतरताही पूर्ण होऊ शकते.

Child Care Tips
Foods For Dehydration : शरीरात पाण्याची कमतरता वारंवार होतेय ? यांना आहारात द्या स्थान, होईल अनेक रोगांपासून सुटका

२. बीटरूटमध्ये भरपूर प्रमाणात लोह असते. फक्त बीटरूटचा रस देखील मुलांना दिला जाऊ शकतो. तसेच, बीटामध्ये संत्रा घालून या दोन्हींचे मिश्रण केल्याने शरीराला भरपूर लोह तसेच जीवनसत्त्व क मिळू शकते.

३. शरीरातील लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी लहान मुलांना भोपळ्याचा रस दिला जाऊ शकतो. भोपळ्याचा रस बनवण्यासाठी मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. चवीनुसार त्यात हलकी साखर किंवा मीठ घालता येईल.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com