Child Care Tips : तुमची मुले झोपेतून उठल्यानंतर सतत डोळे चोळतात? होऊ शकतो हा गंभीर आजार

झोपेतून उठल्यानंतर मुले डोळे का चोळतात ?
Child Care Tips, Eye care tips
Child Care Tips, Eye care tips Saam tv

Child Care Tips : मुलांना झोपेतून उठल्यानंतर अधूक दिसू लागते म्हणून ते डोळे चोळू लागतात. पंरतु, या समस्येकडे पालक कटाक्षपणे दुर्लक्ष करतात.

हे देखील पहा -

मुले अभ्यास करताना, खेळताना किंवा टिव्ही बघताना सतत डोळे चोळत असतील तर या समस्येकडे दुर्लक्ष करु नका. लॉकडाऊनच्या काळानंतर ही समस्या मुलांमध्ये अधिक प्रमाणात दिसून येत आहे. काहीवेळेस मुलांच्या डोळ्यांतून सतत पाणी निघते तर काही वेळा डोळे कोरडे पडतात. डोळ्यांच्या कोरडेपणामुळे मुले अस्वस्थ होऊ शकताता. त्यामुळे त्यांच्या डोळ्यांवर त्यांना सतत ताण जाणवू लागतो.

कोरड्या डोळ्याच्या सिंड्रोममुळे सकाळच्या वेळी वालुकामय, किरकोळ संवेदना होतात ज्या दिवसभर राहू शकतात. यामुळे मुलांची दृष्टी अंधुक होऊ शकते. परंतु कोरड्या डोळ्यांमुळे सहसा दीर्घकाळ दृष्टी समस्या उद्भवत नाही. (Eye Care Tips for Child)

डोळे (Eye) कोरडे होण्याची वेगवेगळी कारणे आहेत. बहुतेकदा कोरडे हवामान, धूर किंवा प्रदूषण डोळ्यांना त्रास देऊ शकते. इतर वेळी, ऍलर्जी किंवा कॉन्टॅक्ट लेन्स देखील डोळ्यांना त्रास देऊ शकतात. हा त्रास जाणवत असल्यास आपण नेत्रतज्ज्ञांची मदत घेऊ शकतो.

Child Care Tips, Eye care tips
Baby Care Tips : लहान मुलांना हे सूपरफूड लगेच खाण्यास देऊ नका, आयुर्वेद सांगतेय त्याच्या खाण्याची योग्य वेळ कोणती ?

मुलांचे डोळे कोरडे कशामुळे होतात?

ड्राय आय सिंड्रोम हे सतत फोन, टिव्ही, लॅपटॉपचा वापर करणे किंवा अंधारात बसून वाचन किंवा लिखाण करणे यांमुळे ही समस्या उद्भवू शकते. कधीकधी डोळ्यांची जळजळ होते, खाज सुटते, चिडचिड होणे आणि सतत डोळे लुकलुकणे यांसारख्या समस्या जाणवू लागतात. हे आक्रमक अँटीहिस्टामाइन वापरल्यामुळे डोळ्यांना कोरडेपणा येऊन ऍलर्जी होऊ शकते. मुलांच्या वयोमानानुसार त्यांना कॉन्टॅक्ट लेन्स घालणे.

कधीकधी, डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भागाचा होणारा दाह कोरड्या डोळ्याचा एक प्रकार होऊ शकतो. पोषणाची कमतरता आणि स्मार्टफोन आणि इतर डिजिटल उपकरणांचा वापर केल्यामुळे हा त्रास जाणवू लागतो. (Child Care Tips)

लक्षणे -

मुलांना त्यांच्या डोळ्यांशी होणारा त्रासाबद्दल पालकांना स्पष्टपणे सांगता येत नाही. पण ते सतत डोळे चोळत असतील तर पालकांनी मुलांवर (Kids) लक्ष ठेवायला हवे व त्याचे नेमके कारण कोणते हे समजून घ्यायला हवे. डोळे वारंवार लुकलुकणे, डोळ्यांना लालसरपणा येणे, सतत डोळे चोळणे, प्रकाशाच्या स्त्रोतांपासून दूर राहाणे किंवा जळजळ होण्याचे क्षण अंधुक दृष्टीचे क्षण वाचण्यात अडचण, डिजिटल उपकरणांवर काम करणे ही लक्षणे मुलांमध्ये दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com