Gas Cylinder Safety Tips: तुमच्या घरातल्या गॅस सिलिंडरचाही स्फोट होऊ शकतो; आजच 'या' गोष्टी तापासून घ्या

How To Check Expiry Date Of Gas Cylinder: गॅस सिलिंडरचा वापर मोठ्याप्रमाणात वाढला आहे. मात्र अद्यापही नागरिकांमध्ये या बाबद जागरूकता नाहीये.
Gas Cylinder Safety Tips: तुमच्या घरातल्या गॅस सिलिंडरचाही स्फोट होऊ शकतो; आजच 'या' गोष्टी तापासून घ्या
Gas Cylinder DateSaam TV
Published On

पूर्वीच्या काळी व्यक्ती जेवण बनवण्यासाठी अग्नीसाठी लाकडांचा उपयोग करत होते. चु्ल्हीवर लाकूड जाळून जेवण बनवलं जायचं. मात्र आता घरोघरी गॅस सिलिंडर पोहचले आहेत. त्यामुळे सर्व महिला यावरच जेवण बनवतात. गॅस सिलिंडरचा वापर मोठ्याप्रमाणात वाढला आहे. मात्र अद्यापही नागरिकांमध्ये या बाबद जागरूकता नाहीये.

आजही अनेक ठिकाणी गॅस सिलिंडर घेताना कोणत्या गोष्टी तपासल्या पाहिजेत हे अनेक महिलांना माहिती नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी गॅस सिलिंडरचा स्फोट होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. तर अशी घटना तुमच्याबरोबर देखील घडूनये यासाठी गॅस सिलिंडरचा स्फोट नेमका का होतो आणि गॅस सिलिंडर खरेदी करताना कोणती काळजी घ्यायला हवी त्याची माहिती जाणून घेऊ.

Gas Cylinder Safety Tips: तुमच्या घरातल्या गॅस सिलिंडरचाही स्फोट होऊ शकतो; आजच 'या' गोष्टी तापासून घ्या
Gas Cylinder Blast : गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन तीन घरांचे नुकसान; कुटूंबाचा संसार उघड्यावर

गॅस लिक आहे का तपसा

गॅस सिलिंडरची टाकी घरी आल्यावर ती कुठे लिक आहे का हे तपासून घ्या. गॅस सिलिंडर लिक असले तर लगेचच त्याचा वास येतो. लिक झालेल्या गॅस जवळ लायर किंवा माचीसची काडी पेटवली तर लगेच आगीचा भडका उडतो.

एक्सपायरी तारीख तपासा

प्रत्येक प्रोडक्टप्रमाणे गॅसची सुद्धा एक एक्सपायरी डेट असते. त्यामुळे सर्वात आधी सिलिंडरची टाकी घरी आल्यावर त्याची तारीख तपासा. तारीखेवरून तुम्हाला लगेच समजेल की ही गॅस सिलिंडर टाकी तुम्ही किती दिवस वापरू शकता.

तारीख कशी चेक करायची

गॅस सिलिंडर टाकीवर ३ पट्ट्या असतात. त्यातील एका पट्टीवर B-13, A-14 असे विविध आकडे आणि ABCD चे अल्फाबेट असतात. हे तुम्हाला समजले पाहिजे. हिच तारीख असते.

म्हणजे जर १४, १५, १८, २०, २४, २५ असे क्रमांक सिलिंडरच्या कोडमध्ये असतील तर ते यातून वर्ष सांगतात. जसं की आता २०२४ सुरू आहे. तर तुमच्या सिलिंडरवर किमान २५ हा आकडा असावा.

तसेच ABCD चे अल्फाबेट यातून महिना सांगतात

A - जानेवारी ते मार्च

B - एप्रिल ते जून

C - जुलै ते सप्टेंबर

D - ऑक्टोबर ते डिसेंबर

Gas Cylinder Safety Tips: तुमच्या घरातल्या गॅस सिलिंडरचाही स्फोट होऊ शकतो; आजच 'या' गोष्टी तापासून घ्या
Gas Cylinder Leakage : गॅस गळतीमुळे सिलेंडरने घेतला पेट; लहान मुलांसह ९ जण गंभीर जखमी, एकाची प्रकृती गंभीर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com