Chardham Yatra 2024: भाविकांसाठी मोठी बातमी! अक्षय्य तृतीयेच्या मूहूर्तावर चारधाम यात्रेला सुरुवात; केदारनाथ मंदिराचे दरवाजे दर्शनासाठी खुले

Chardham Yatra 2024 Started: आज अक्षय्य तृतीयेच्या मूहूर्तावर उत्तराखंडमध्ये चारधाम यात्रेला सुरुवात झाली आहे. शुक्रवारी सकाळी केदारनाथ धाम मंदिराचे दरवाजे उघडल्यानंतर या यात्रेची सुरुवात झाली आहे. यावर्षी चारधाम यात्रेला भाविकांनी प्रचंड गर्दी केली आहे.
Chardham Yatra
Chardham YatraSaam Tv

आज अक्षय्य तृतीयेच्या मूहूर्तावर उत्तराखंडमध्ये चारधाम यात्रेला सुरुवात झाली आहे. शुक्रवारी सकाळी केदारनाथ धाम मंदिराचे दरवाजे उघडल्यानंतर या यात्रेची सुरुवात झाली आहे. यावर्षी चारधाम यात्रेला भाविकांनी प्रचंड गर्दी केली आहे.

केदारनाथ धामचे प्रमुख रावल भीमाशंकर लिंग यांनी विधी करुन मंदिराचे दरवाजे उघडले. केदारनाथ धामचे दरवाजे सकाळी ७.१० मिनिटांनी भाविकांसाठी उघडले गेले आहेत. यानंतर १०.२९ मिनिटांनी यमुनोत्री धाम तर १२.२५ वाजता गंगोत्री धामचे दरवाजे उघडले जाणार आहेत. अनेक वर्षांनंतर गंगोत्री, यमुनोत्री आणि केदारनाथ मंदिरांचे दरवाजे एकाच वेळी उघडले जाणार आहे.

बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे १२ मेपासून भाविकांसाठी खुले होणार आहे. केदारनाथच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. देशभरातून अनेक भाविक आज केदारनाथमध्ये दाखल झाले आहेत. चारधाम यात्रेनिमित्त संपूर्ण केदारनाथ मंदिराची फुलांनी सजावट करण्यात आली आहे. केदारनाथचे मंदिर वर्षातून फक्त काहीच महिने भाविकांसाठी खुले असते. त्यामुळेच भाविकांनी दर्शन घेण्यासाठी गर्दी केली आहे.

Chardham Yatra
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीया सणाला आहे खास महत्व; तुम्हाला आहे का ही माहिती? जाणून घ्या

चारधाम परिसरात पावसाची शक्यता

शुक्रवारी चारधाम परिसरात पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. डेहराडून हवामान खात्याच्या मते, उत्तर काशी, चमोली आणि रुद्रप्रयाग जिल्ह्यातील चारधाम यात्रा मार्गांवर विजांच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो. तर ४ हजार मीटरपेक्षा उंचीवरील भागात बर्फवृष्टीदेखील हो शकते. तापमान १ ते २ अंश सेल्सियने घसरण्याची शक्यता आहे.

Chardham Yatra
4 day Work week: आठवड्यातून ४ दिवस काम, कामाची गुणवत्ता वाढेल का? ८१ टक्के लोकांना जे वाटतं ते तुम्हालाही वाटतंय का?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com