Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीया सणाला आहे खास महत्व; तुम्हाला आहे का ही माहिती? जाणून घ्या

Akshaya Tritiya Marathi: अक्षय तृतीयेचे महत्त्व या दिवशी सुरू केलेल्या कोणत्याही कामाचा क्षय होत नाही असे म्हणतात. म्हणून याला अक्षय तृतीया असे संबोधले आहे.
Akshaya Tritiya 2024
Akshaya Tritiya 2024Saam Tv

अक्षय तृतीयेचे महत्त्व या दिवशी सुरू केलेल्या कोणत्याही कामाचा क्षय होत नाही असे म्हणतात. म्हणून याला अक्षय तृतीया असे संबोधले आहे. आज घेतलेल्या गोष्टी विपुल प्रमाणात पुन्हा पुन्हा आपल्याला मिळतात. म्हणून अक्षय तृतीया अर्थात वैशाख मासातील शुक्ल पक्षातील तृतीया ही महत्त्वाची मानली जाते.

सोने खरेदी करणे आज शुभ आहे. यामुळे तुमच्या संपत्तीमध्ये सातत्याने वाढ होताना दिसते. अक्षय तृतीयेला लक्ष्मी बरोबर भगवान महाविष्णूची पूजा करणे सुद्धा फायदेशीर मानले जाते. खरे तर या दिवशी कुबेर, शिव आणि ब्रह्मदेव यांना अलकापुरी नावाचे नवीन राज्यप्राप्त झाले.

Akshaya Tritiya 2024
Rashi Bhavishya : अक्षय तृतीयाला जुळून आला खास योग; ‘या’ राशींचे नशीब चंद्रासारखे चमकणार, वाचा राशिभविष्य

आणि म्हणून लोक भगवान कुबेराच्या नावाने सोन्याचे दागिने आणि मालमत्ता खरेदी करतात कारण तो दिवस पवित्र आहे .साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेला हा दिवस नरनारायण, परशुराम आणि हायग्रीव यांचा जन्म झाला म्हणून या दिवशी यांचा जन्मोत्सव आहे.

अक्षय म्हणजे मुळातच कोणती गोष्ट कधीही क्षय न पावणारी नाश न पावणारी अशी असते. आज पितरांसाठी विशेष उपासना करावी. पाण्याने भरलेला घट पूजा विधी करून ब्राह्मणाला दान दक्षिणेसह दान केल्यास त्याचेही पुण्य अक्षय लाभते.

Akshaya Tritiya 2024
Todays Horoscope: व्यवहारात सतर्कता, जोडीदारासोबत प्रेमाने वागा; जाणून घ्या तुमच्या राशीत काय?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com