Rashi Bhavishya : अक्षय तृतीयाला जुळून आला खास योग; ‘या’ राशींचे नशीब चंद्रासारखे चमकणार, वाचा राशिभविष्य

Rashi Bhavishya Today 10 May 2024: आजचे राशिभविष्य, १० मे २०२४ : अक्षय तृतीयाला जुळून आला खास योग; ‘या’ राशींचे नशीब चंद्रासारखे चमकणार, जाणून घ्या तुमचे राशिभविष्य
Rashi Bhavishya Today 10th May 2024
Rashi Bhavishya Today 10th May 2024Saam TV

दैनिक पंचांग मे २०२४

वार - शुक्रवार तिथी - शु. तृतीया नक्षत्र - रोहिणी. योग - अतिगंड. करण- तैतील . रास - वृषभ२२/२६ प . नंतर मिथुन. अक्षय तृतीया. दिनविशेष - शुभ दिवस.

मेष : कुटुंबीयांसोबत आनंदाने दिवस जाईल

साडेतीन मुहूर्तापैकी आजचा एक मुहूर्त अक्षय तृतीया. खरेच आपल्याला सोन्याच्या संधी घेऊन आला आहे. म्हणून सोने खरेदी आपल्यासाठी फायदेशीर ठरेल. कुटुंबीयांसोबत आनंदाने दिवस जाईल.

वृषभ : खाण्यापिण्याची चंगळ राहील

नवीन वस्त्र अलंकार आज परिधान कराल. अक्षय राहणाऱ्या गोष्टी आज मिळण्यासाठी विशेष आराधना करा. आज मात्र आपला आनंद अक्षय राहील हे नक्की. मनासारख्या गोष्टी आणि खाण्यापिण्याची चंगळ राहील.

मिथुन : होऊ दे खर्च असा आज दिवस

होऊ दे खर्च असा आज दिवस. मग तो आपल्यासाठी असो व इतरांसाठी. विनाकारण नाही पण कारणास्तव व्यय आज संभवतो आहे. त्यामुळे उगाचच त्याचा मनस्ताप न करता take it easy.

कर्क : कामाच्या रगड्यात स्वतःला गुंतवून घेऊ नका

"कशासाठी आटापिटा कशासाठी कसविशी" असा काही आजचा दिवस नाही. उगाचच कामाच्या रगड्यात स्वतःला गुंतवून घेऊ नका. तोच आनंद सगळ्यांना वाटा आणि बघा कसा दिवस मस्त होईल.

सिंह : काही गोष्टींचे मनात इमले बांधाल

"दुनिया गई भाड मे" असा दिवस. कामे जोमाने कराल पैसाही खणखणीत वाजवून घ्याल. नवीन काही गोष्टींचे मनात इमले बांधाल.

कन्या : कर्म करा आणि सुखी राहा

मनाचे मनोरे उंच भराऱ्या घेतील आणि त्याला साथ सर्वांचीच मिळेल देवधर्म, अध्यात्म, दानधर्म यामध्ये आजचा दिवस जाईल. मनशांती मिळवण्याकडे कौल घेऊन आलेला आहे. त्यामुळे ही कर्म करा आणि सुखी राहा.

Rashi Bhavishya Today 10th May 2024
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीया सणाला आहे खास महत्व; तुम्हाला आहे का ही माहिती? जाणून घ्या

तूळ : त्रागा करून घेऊ नका

दिवस सोन्याचा असला तरी काही गोष्टी पाचवीला पुजल्यात त्या काही तुम्हाला टाळता येणार नाहीत. काम करणे मेहनत करणे आणि पुढे जाणे हे आजचे द्योतक आहे. पण म्हणून त्रागा करून घेऊ नका.

वृश्चिक : तुटलेली नाती आज नव्याने बांधा

"कितीक हळवे कितीक सुंदर असे शहाणे आपले अंतर" आजचा दिवस आहे जवळ असाल अथवा नसाल दोघांसाठी जोडीदाराकडून प्रेमच प्रेम घेऊन आलेला असा हा क्षण. तुटलेली नाती आज नव्याने बांधा.

धनु : पितरांसाठी विशेष दान करा

आज दानाच्या पुण्याने मनोव्यथा कमी होतील. काही जुने रोग व आजार असतील तर आज पितरांसाठी विशेष दान करा. त्याचे पुण्य पदरात येईल.

मकर : सौख्य घेऊन आलेला दिवस

"काय बाई सांगू कसं ग सांगू" असा आजचा दिवस आहे. एकूणच सगळं अलबेल, सौख्य घेऊन आलेला दिवस. कला, मनोरंजन, संतती, प्रेम, प्रणय यात साखर पेरणी होणार नक्की.

कुंभ : नवीन वस्तू खरेदीचे योग आहेत.

दूध दुभते जनावरांची आज विशेष सेवा करा. पुढील भविष्यासाठी फायदेशीर ठरेल. नवीन वस्तू खरेदीचे योग आज दिसत आहेत.

मीन : स्वतःवरच अभिमान वाटेल

मनाची ताकद आणि बाहू ची शक्ती असा संगम आजचा दिवस आहे. ठरवेल ते कराल. इतरांसाठी भक्कमपणे उभे रहाल. आनंद मिळेल. स्वतःवरच अभिमान वाटेल.

Rashi Bhavishya Today 10th May 2024
Horoscope Today : मेषसह ५ राशीच्या लोकांसाठी आज सोन्यासारखा दिवस

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com